Home /News /videsh /

चीननंतर आता पाकिस्तानने आणखी एका देशापुढे पसरले हात; भारतविरोधी कारवायांसाठी तुर्कस्तानकडून घेणार रडार

चीननंतर आता पाकिस्तानने आणखी एका देशापुढे पसरले हात; भारतविरोधी कारवायांसाठी तुर्कस्तानकडून घेणार रडार

चीनची शस्त्रास्त्र आणि अमेरिकेचं अर्थसाहाय्य याच्या जोरावर अर्थव्यवस्था दुबळी असूनही पाकिस्तान (Pakistan) भारताविरोधात (India Pakistan relations) कारवाया करत आहे. आता त्यांनी लष्करी रडारसाठी तुर्कस्तानपुढे (Turkey) हात पसरले आहेत.

पुढे वाचा ...
    कराची, 21 ऑक्टोबर :  पाकिस्तानी दहशतवादी (Pakistan terrorists) भारतात घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न करत असतात. भारतीय लष्कराने (Indian army) असे अनेक प्रयत्न धुळीस मिळवले आहेत. पण भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान आणखी जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी त्यांनी तुर्कस्तानकडे (Turkey) हात पसरले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी किंवा त्यांच्या सरकारमधल्या कोणी यासंबंधी कुठलीही अधिकृत वाच्यता अद्याप केलेली नसली, तरी ही माहिती बाहेर आलेली आहे. पुलवामातील हल्ल्यानंतर (Pulwama attack) भारताने बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करून पाकिस्तानला ताकद दाखवली. त्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली होती. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी आता प्रयत्न करत करत असल्याची गुप्तचरांची बातमी आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था इतकी कमकुवत आहे की त्यांना अमेरिका आणि चीनच्या अर्थसहाय्यावरच राहावं लागतं. पण भारताविरुद्धच्या कारवायांसाठी पाकिस्तान चीनकडून शस्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानही घेत असतो. आता या वेळी त्यांनी तुर्कस्तानपुढेही हात पसरले आहेत. भारतीय लष्कराने सीमांवर इतका कडक पहारा ठेवला आहे की दहशतवाद्यांना घुसखोरी करणं अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळेच त्यांनी टर्कीकडे आधुनिक रडार सिस्टीमची  मदत मागितली आहे. रडार सिस्टिमसाठी तुर्कीसमोर पसरलेत हात रॅटिनार PTR-X पॅरॅमीटर सर्व्हिलन्स रडार यंत्रणा देण्याची विनंती पाकिस्तानने तुर्कस्तानकडे केली आहे. ही सर्व्हिलन्स यंत्रणा सीमेवरील पहाऱ्यासाठी खूप उपयुक्त असून, ती पोर्टेबल असल्यामुळे दोन जण ती एका जागेहून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर ती यंत्रणा पूर्णपणे ऑटोमॅटिक असल्याने खूप मोठ्या परिसरात स्कॅन करू शकते. केवळ एक माणूस ही यंत्रणा वापरू शकतो आणि ती असेल तर सतत कॅमेरे आणि दुर्बिणींनी नजर ठेवण्याची गरज भासत नाही. चीनकडे मागितली होती मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टिम बालाकोटमध्ये भारतीय सैन्याने सडकून काढल्यानंतर पाकिस्तानने तातडीने चीनकडे क्षेपणास्र यंत्रणा मागितली होती. गुप्त अहवालांतून हे स्पष्ट झालंय की पाकिस्तानने चीनकडे मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टिम A-300 ची मागणी केली होती. लांब पल्ल्याच्या या रॉकेट सिस्टिमचा वापर भविष्यातील भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी करण्याचा पाकिस्तानचा मनोदय आहे. A-300 MLRS यंत्रणा  90 ते 299 किलोमीटर  अंतरावरील लक्ष्य अचूकपणे भेदू शकते, असं सांगितलं जातं. सध्या पाकिस्तानी लष्कराकडे A-100 च्या दोन रेजिमेंट आहे आणि त्यांना मजबूत करण्यासाठीच पाकिस्तानने चीनकडे A-300 MLRS मागितली होती. चीनकडून ड्रोनचीही मागणी भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तान चीनकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनची खरेदी करत आहे ज्यात कॉम्बॅट ड्रोनचाही समावेश आहे. या ड्रोनचा वापर करून भारताला लागून असलेल्या सीमा भागांत पहारा देण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. घुसखोरी सुरूच गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. अशात घुसखोरीचे पारंपरिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे दहशतवादीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Pakistan, Turkey

    पुढील बातम्या