पाकमध्ये आरोग्य सेवाचा अभाव, फक्त 2 व्हेंटिलेटर्समुळे नागरिकांचे हाल

पाकमध्ये आरोग्य सेवाचा अभाव, फक्त 2 व्हेंटिलेटर्समुळे नागरिकांचे हाल

पाकिस्तानात 85,264 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 05 जून : चीनच्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरसनं पाकिस्तानतही थैमान घातलं आहे. पाकिस्तानमधील काही भागांमध्ये हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी भीषण स्थिती असल्याचं समोर आलं आहे. अपुरा वैद्यकीय सुविधा, अन्नाची कमतरता यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये 800 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असूनही तिथे केवळ दोनच व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यात पाकिस्तान सरकारकडून अद्याप मदत मिळाली.

हे वाचा-'या' ब्लड ग्रुपला कोरोनाचा सर्वात जास्त धोका, डॉक्टरांचा नवा रिसर्च आला समोर

वकील मोहम्मद बकर मेहेदी यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की सरकार पैसे आणि देणग्यांचा उपयोग लोकांच्या हितासाठी नाही तर आपल्या हेतूसाठी केला जात असल्यानं अनेक रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. 24 तासांत कोरोनाच 4, 688 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 82 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानात 85,264 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात सुमारे दहा हजार नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. याशिवाय एकाच वेळी 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रूग्णांची संख्या 2,26,770 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 6348. लोक मरण पावले आहेत. गेल्या एका दिवसात 9851 प्रकरणं समोर आली आहेत.

हे वाचा-धक्कादायक! केरळमध्ये याआधी झाला आहे हत्तीणीचा फटाक्यांमुळे क्रूर मृत्यू

हे वाचा-corona : वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डॉक्टरांनी तिला दिली होती मोजून 3 मिनिटं

 

संपादन- क्रांती कानेटकर

 

First published: June 5, 2020, 2:25 PM IST

ताज्या बातम्या