लाहोर, 28 जानेवारी : पाकिस्तानातील (Pakistan News) पंजाब प्रातांच्या राजधानीत 14 वर्षी तरुणाने कथित स्वरुपात ऑनलाइन गेम पब्जीच्या (PUBG) प्रभावाखाली येत आई आणि दोन अल्पवयीन बहिणींसह संपूर्ण कुटुंबाची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या आठवड्यात लाहोरची राहणारी 45 वर्षीय आरोग्य महिला कार्यकर्ता नाहिद मुबारक आपल्या 22 वर्षीय मुलगा तैमूर आणि 17 , 11 वर्षांच्या दोन मुलींसह मृतावस्थेत आढळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या 14 वर्षांच्या मुलानेच सर्वांची हत्या केली आहे आणि आता हा आपल्या कुटुंबातील एकमेव सदस्य शिल्लक राहिला आहे. पोलिसांनी पुढे सांगितलं की, PUBGचं (प्लेयर यूएनडॉग्स बैटलग्राउंड) व्यसन लागल्याचं मुलाने कबुल केलं आहे. खेळाच्या प्रभावाखाली त्याने आई, भाऊ, बहीण यांची हत्या केली. दिवस दिवसभर ऑनलाइन गेम खेळत असल्यामुळे त्याला मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे.
आई आणि तीन भाऊ-बहिणींना झोपेतच घातल्या गोळ्या..
पोलिसांनी सांगितलं की, नाहिद हिचा घटस्फोट झाला होता आणि तिची मुलं अधिकतर वेळ ऑनलाइन गेम खेळण्यात घालवत होती. त्याचं अभ्यासात अजिबातच लक्ष नव्हतं. यावरुन ती अनेकदा त्यांना ओरडतही होती. आई वारंवार ओरडत असल्याचं पाहून मुलाने कपाटातून आईची बंदूक बाहेर काढली आणि त्याने तिनही भाऊ-बहिणींवर गोळी झाडली.
हे ही वाचा-'मुलगी काही संपत्ती नाही'; तांत्रिकाला 'कन्यादान' केल्यानंतर न्यायालयाने फटकारलंमुलाने सांगितलं की...
दुसऱ्या दिवशी शेजारच्यांनी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी मुलाने पोलिसांना सांगितलं की, तो घरात वरच्या मजल्यावर आहे आणि घरातील सदस्यांची हत्या कशी झाली याबद्दल त्याला काहीच माहिती नाही. लायसन्स पिस्तूल नाहिदने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ठेवली होती. सोबतच पोलिसांनी सांगितलं की, मुलाने सर्वांची हत्या केल्यानंतर हत्यार नाल्यात फेकून दिलं होतं. अद्याप या हत्याचाराच शोध घेतला जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.