फक्त भारतावर नाही तर तुमच्यावर देखील हल्ला करू; पाक मंत्र्याची धमकी!

फक्त भारतावर नाही तर तुमच्यावर देखील हल्ला करू; पाक मंत्र्याची धमकी!

इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल...

  • Share this:

कराची, 30 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir)मधून कलम 370 हटवण्याच्या घटनेला दोन महिने होऊन देखील पाकिस्तान सुधारण्याचे नाव घेत नाही. कलम 370वरून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरुद्ध मोहिम उघडल्यानंतर पाकने धमकी देण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan Government) यांच्यापासून ते त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी भारताला युद्धाची धमकी दिली होती. इम्रान खान यांनी देखील अण्विक युद्धाची धमकी दिली होती. पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला त्याला यश आले नाही. संयुक्त राष्ट्र संघात देखील पाकिस्तानला तोंडावर पडावे लागले. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील प्रश्न असताना पाकमधील एका मंत्र्याने चक्क अन्य देशांनाच धमकी दिली आहे.

इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील पाक व्याप्त काश्मीरमधील काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान प्रांताचे मंत्री अली अमीन गंडापूर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ते म्हणतात, 'जो देश काश्मीरप्रकरणी भारताला समर्थन देईल, त्या देशावर आम्ही रॉकेट हल्ला करू'. अमीन यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील एका पत्रकाराने अमीन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, जर काश्मीरवरून भारतासोबत तणाव वाढला तर पाकिस्तानला युद्ध करावे लागले. युद्धाच्या परिस्थितीत जो देश भारताचे समर्थन देईल तो आमचा शत्रू असेल आणि आम्ही भारतासोबत त्यांना समर्थन देणाऱ्या देशांवर रॉकेटने हल्ला करू.

जम्मू्-काश्मीरमध्ये भारताकडून सुरु असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाबद्दल जग काहीच बोलत नाही यावर अमीन यांनी नाराजी व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव सुरु आहे. हा तणाव दोन्ही देशातील युद्धाचे कारण होऊ शकते, असे ते म्हणाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरब दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्या मंत्र्याचे हे वक्तव्य केले आहे. पाकिस्तान सौदी अरबला स्वत:चा जवळचा देश मानतो. सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी अनेक वेळा इम्रान खान यांचे समर्थन केले आहे. भारताने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. तसेच जम्मू-काश्मीरमधील लडाख हा भाग वेगळा करत तो केंद्र शासित करण्यात आला. कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारने काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली आणि अनेक गोष्टींवर बंदी घातली.

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

Published by: Akshay Shitole
First published: October 30, 2019, 9:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading