• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • महिला आमदाराचा Boyfriend सोबत अश्लील Video Viral करणाऱ्याला अटक

महिला आमदाराचा Boyfriend सोबत अश्लील Video Viral करणाऱ्याला अटक

सानिया आशिक पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) च्या सदस्या असून पंजाब प्रांतातील तक्षशिला विधानसभा मतदारसंघाच्या प्रांतीय (MPA) सदस्य आहेत.

 • Share this:
  इस्लामाबाद, 20 नोव्हेंबर: पाकिस्तानमध्ये (Pakistan) महिला आमदाराचा (Woman MLA) कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल (Objectionable Video Viral) केल्याप्रकरणी आणि धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सानिया आशिक (Sania Ashiq)असे या महिला आमदाराचे नाव आहे. सानियाच्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे. सानिया आशिक पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) च्या सदस्या असून पंजाब प्रांतातील तक्षशिला विधानसभा मतदारसंघाच्या प्रांतीय (MPA) सदस्य आहेत. तक्रारीनंतर एकाला अटक या व्हिडिओबाबत सानिया आशिकने 26 ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली होती. सखोल तपासानंतर पोलिसांनी व्हिडिओ लीक केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे. हेही वाचा- 250 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेची सत्ता होती महिलेच्या हाती टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल सानियाने 26 ऑक्टोबर रोजी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) कडे अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. तपासानंतर बुधवारी व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. एजन्सीकडून तपास सुरू तक्रारीनंतर पंजाब प्रांतातील पोलीस आणि एफआयएने तपास सुरू केला. तीन आठवड्यांच्या तपासानंतर एफआयएने लाहोरमधून एका व्यक्तीला अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी त्याची ओळख उघड केली नाही. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक आहे की अन्य कोणी आहे हे देखील सांगण्यात आले नाही. या व्यक्तीच्या अटकेची केवळ माहिती देण्यात आली आहे. महिला आमदाराचं ट्विट सानियाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "त्यानं (अज्ञात) माझा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल करण्यासोबतच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो पोस्ट केले आहेत. व्हिडिओतील महिला माझ्यासारखी दिसते आहे. त्यानंतर शेकडो धमकीचे कॉल, टिकटॉकवर अश्लील गाणी, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, माझ्याशी संबंधित यादृच्छिक क्लिप म्हणजे माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनल ARY च्या वृत्तानुसार, सानिया आशिक पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज(PML-N) ची सदस्य आहे आणि पंजाब प्रांतातील तक्षशिला विधानसभा मतदारसंघातील आमदार आहे. नुकताच एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सानियाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर सानियाने स्वतः पोलिसात तक्रार केली. हेही वाचा- देशाची राजधानी अजूनही  Air Pollution च्या विळख्यात, आजही वाईट हवा सानिया ही नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्या खूप जवळची मानली जाते. तिने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना घेरलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: