Home /News /videsh /

पाकिस्तानचे पंतप्रधान बरळले, भाषणात केला पुन्हा काश्मीरचा जप; भारताला केलं आवाहन

पाकिस्तानचे पंतप्रधान बरळले, भाषणात केला पुन्हा काश्मीरचा जप; भारताला केलं आवाहन

पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistani Prime Minister) म्हणाले की, आशियातील चिरस्थायी शांततेसाठी भारताने 5 ऑगस्ट 2019 पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पूर्वस्थिती पूर्ववत करावी आणि कलम 370 वरील आपला निर्णय मागे घ्यावा.

    इस्लामाबाद, 28 मे: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan's Prime Minister Shahbaz Sharif) यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात पुन्हा एकदा काश्‍मीरबाबतचा (Kashmir) संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भारताला जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) कलम 370 बहाल करण्याचे आवाहन केलं. पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistani Prime Minister) म्हणाले की, आशियातील चिरस्थायी शांततेसाठी भारताने 5 ऑगस्ट 2019 पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पूर्वस्थिती पूर्ववत करावी आणि कलम 370 वरील आपला निर्णय मागे घ्यावा, जेणेकरून जम्मू-काश्मीरचा प्रश्न चर्चेने सोडवला जाईल. ANI या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार शाहबाज शरीफ म्हणाले, आशियामध्ये शांतता पसरवण्यासाठी, 5 ऑगस्ट 2019 चा एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्णय मागे घेणे ही भारताची जबाबदारी आहे. जेणेकरून जम्मू-काश्मीरचा मुद्दा मार्गी लावता येईल. संवादातून सोडवावे. Monkeypox चा सामना करण्यासाठी भारत सज्ज, Test साठी नवं किट लवकरच बाजारात पीटीआय शाहबाज वृत्तसंस्थेनुसार, शाहबाज शरीफ आपल्या भाषणात म्हणाले, आमच्या भावी पिढ्यांना त्रास का घ्यायचा आहे? संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार आणि काश्मिरींच्या अपेक्षांनुसार हा प्रश्न सोडवू या, जेणेकरून सीमेच्या दोन्ही बाजूची गरिबी संपुष्टात येईल. या वर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी देशाच्या नॅशनल असेंब्लीमध्ये उद्घाटनाच्या भाषणात जम्मू-काश्मीरचा मुद्दाही उपस्थित केला होता. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्लीनं संविधानातील कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव आणखी वाढला आहे. भारताच्या या निर्णयानंतर इस्लामाबादने राजनैतिक संबंध कमी केले. दरम्यान भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला वारंवार सांगितलं आहे की, कलम 370 रद्द करणं ही आपली अंतर्गत बाब आहे. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या सरकारला इंधनाचे दर वाढवणे भाग पडले, असे शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात सांगितले. 26 मे रोजी पाकिस्तानने पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती 30 रुपयांनी वाढवल्या होत्या. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांचे पूर्ववर्ती इम्रान खान यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, लोकांच्या मागणीनुसार आम्ही भ्रष्ट सरकार बदलले. शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना 28 अब्ज रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या