Home /News /videsh /

नरेंद्र मोदींना पत्र लिहिणं पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अंगाशी, स्वतःच्या देशातच ट्रोल

नरेंद्र मोदींना पत्र लिहिणं पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अंगाशी, स्वतःच्या देशातच ट्रोल

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी भारत आणि पाकिस्तानसाठी "परस्पर शांतता आणि समृद्धीच्या हितासाठी" जम्मू-काश्मिरचा विवाद सोडविण्याचे आवाहन केले आहे.

पुढे वाचा ...
    लाहोर, 18 एप्रिल : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी भारत आणि पाकिस्तानसाठी "परस्पर शांतता आणि समृद्धीच्या हितासाठी" जम्मू-काश्मीरचा विवाद सोडविण्याचे आवाहन केले आहे. शाहबाज शरीफ यांनी नुकताच पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान म्हणून पदभार स्विकारला आहे. शरीफ यांनी पदभार स्विकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत त्यांचे अभिनंदन केले होते. तसेच त्यांना एक पत्रही लिहिले होते. त्या पत्रात मोदींनी दहशतवादमुक्त क्षेत्राची चर्चा झाली. याला उत्तर देताना पाकिस्तानी पंतप्रधानांनीही पत्र लिहून प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर त्यांच्या पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त म्हणाले की, शरीफ यांची खूप कमजोर प्रतिक्रिया आहे. काश्मीर हा कोणता मुद्दा नाही तर वाद आहे. पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन संवादात दहशतवादाचा उल्लेख केला होता. मात्र, काश्मीरमध्ये भारताने पोसलेल्या दहशतवादाचे काय? कमांडर कुलभूषण जाधवबाबत काय? पाकिस्तानला याप्रकारे क्षमा याचना करायची गरज नाही. तसेच पाकिस्तानच्या पीएम शरीफ हे भारताला आणखी वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकले असते. जिया ऊर रहमान या युवकाने लिहिले आहे की, पाकिस्तानी सरकार नेहमी क्षमाप्रार्धी राहिले आहे. हे वाचा - मृत्यूशी झुंज देतोय भारताचा माजी क्रिकेटपटू, दोन्ही किडन्या झाल्या निकामी शरीफ यांच्या पत्रात काय? आमचा विश्वास आहे की पाकिस्तान आणि भारत यांच्यातील शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध आपल्या लोकांच्या आणि प्रदेशाच्या प्रगती आणि सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या मूळ मुद्द्यासह इतर सर्व विवादांचे शांततापूर्ण निराकरण आणि अर्थपूर्ण सहभागाद्वारे हे साध्य केले जाऊ शकते. आपल्या लोकांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करूया, असेही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले आहेत. शरीफ यांनी सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद म्हटले. तसेच त्यांनी लिहिले की, प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी पाकिस्तानही कटिबद्ध आहे, असे मी सांगू इच्छितो. दहशतवादाशी लढा देण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी आमचे त्याग आणि योगदान जागतिक स्तरावर ओळखले जाते आणि मान्य केले जाते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Narendra modi, Pakistan

    पुढील बातम्या