• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यामुळे इम्रान खान खूश; म्हणे, तालिबानने गुलामीच्या बेड्या तोडल्या

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यामुळे इम्रान खान खूश; म्हणे, तालिबानने गुलामीच्या बेड्या तोडल्या

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरु असलेल्या हिंसाचाराचा (violence) जगातील अनेक देशांकडून निषेध नोंदवण्यात येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी मात्र या घटनेचं स्वागत केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरु असलेल्या हिंसाचाराचा (violence) जगातील अनेक देशांकडून निषेध नोंदवण्यात येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी मात्र या घटनेचं स्वागत केलं आहे. अफगाणिस्तानातील ‘तालिबान राज’वर आपण खुश असल्याचं पंतप्रधान इम्रान खान सांगत असल्याचा एक व्हिडिओ सध्या पाकिस्तानात व्हायरल होत असून पाकिस्तानमधील अनेक नागरिकांनाही याचा धक्का बसला आहे. काय म्हणाले इम्रान खान? अफगाणिस्तानात तालिबाननं गुलामीच्या बेड्या तोडून टाकल्या आहेत. मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणं हे फारच अवघड असतं. मात्र अफगाणिस्ताननं यशस्वीपणे हे करून दाखवण्यात यश मिळवलं आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी माध्यमांना दिली आहे. पाकिस्तानमध्ये अनेक नागरिक सध्या अफगाणिस्तानात होणाऱ्या हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी मोर्चे काढत असताना आपल्याच पंतप्रधानांनी त्याचं कौतुक केल्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. परराष्ट्रमंत्र्यांकडूनही तालिबानची भलामण पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mehmud Qureshi) यांनीदेखील यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये जर तालिबानचे सरकार आले, तर पाकिस्तान त्याला आनंदाने मंजुरी देईल, असे विधान केले होते. मात्र या प्रश्नावर हिंसाचार हे उत्तर नसून चर्चेच्या मार्गाने प्रश्न सुटायला हवेत, असंही ते म्हणाले होते. अफगाणिस्तानात हिंसाचाराने टोक गाठलं असतानाही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आणि परराष्ट्रमंत्र्यांना ही वस्तुस्थिती दिसत नाही का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. ही वाचा -VIDEO: जीव वाचण्यासाठी विमानाच्या इंजिनवरुन प्रवास,टेक ऑफ करताच खाली पडले अफगाणी पाकिस्तानचे तालिबानसोबत जुने संबंध पाकिस्तानचे तालिबानच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचं यापूर्वी अनेकदा दिसून आलं आहे. अमेरिकेनं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांची चर्चा सुरु झाली तीदेखील पाकिस्तानमधूनच. पाकिस्तानमध्ये तालिबानी नेत्यांच्या बैठकीनंतर या चर्चेची सूत्रं फिरली आणि अऩेक दिवसांपासून रखडलेल्या प्रक्रियेला चालना मिळाली होती. अनेक तालिबानी नेते पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून या संघटनेचे पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध असल्याचं चित्र आहे.
  Published by:desk news
  First published: