पाकिस्तान UN आमसभेतच काश्मीरप्रश्न मांडणार, मोदींच्या नंतर होणार इम्रानचं भाषण

पाकिस्तान UN आमसभेतच काश्मीरप्रश्न मांडणार, मोदींच्या नंतर होणार इम्रानचं भाषण

काश्मीरप्रश्नी पाकिस्तानचं नाक खुपसणं सुरूच आहे. येत्या 27 सप्टेंबरला होणाऱ्या United Nations General Assembly मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मोदींविरोधात काश्मीर मुद्दा मांडणार असल्याचं वृत्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याच्य प्रयत्नात आत्तापर्यंत तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तान पुन्हा एकदा हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात UN मांडणार आहे. हा उद्योग थेट संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत United Nations General Assembly केला जाणार आहे आणि खुद्द पाक पंतप्रधान इम्रान खान Imran Khan जम्मू काश्मीरचा मुद्दा राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडणार आहे.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 भारताने रद्द केलं, त्यानंतर पाकिस्तान हडबडला. प्रथम संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत पाकने चीनच्या मदतीने हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. पण हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं बहुतेक सर्व राष्ट्रांनी मान्य केल्याने पाकिस्तानचा प्रयत्न निष्फळ ठरला. आता इम्रान खान संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मोदींपुढे इमरान खान झुकले; पाकच्या पंतप्रधानावर माजी पत्नींच्या आरोपाने खळबळ!

येत्या 27 सप्टेंबरला होणाऱ्या United Nations General Assembly मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भाषण भारतीय पंतप्रधानांच्या भाषणानंतर होणार आहे, अशी बातमी एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिली आहे. नरेंद्र मोदी इम्रान खान यांच्याआधी भाषण देणार असल्याने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. शिवाय मोदींच्या भाषणातल्या मुद्द्यांना उत्तर द्यायची संधीसुद्धा इम्रान यांना मिळणार आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अब्दुल्ला रिआर यांच्याबरोबर इम्रान खान यांनी बुधवारी चर्चा केली. त्यामध्ये राष्ट्रसंघात मोदीविरोधी घोषणा करण्याच्या सूचना करण्यात आल्याचं समजतं.

पाहा  VIDEO - पाकिस्तानी पत्रकाराने विचारलं, चर्चा कधी? भारतीय मुत्सद्दी अकबरुद्दीन यांनी असं बसवलं गप्प!

काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलवावी असा तगादा पाकिस्तानने त्यांचं मित्रराष्ट्र असलेल्या चीनच्या मदतीने लावून धरला होता. भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तो पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि भारताला अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानने पूर्ण प्रयत्न केले. पण त्यात या देशाला अपयश आलं. सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानचा डाव उघडा पडला. उलट पाकपुरस्कृत दहशतवादामुळे काश्मिरींना विकासापासून दूर दहशतीच्या छायेत कसं जगावं लागलं हे पटवून देण्यात भारतच यशस्वी झाला, असं चित्र आहे.

हेही वाचा - 'उरी'नंतर आता बालाकोटवर होणार सिनेमाची निर्मिती, 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत

कलम 370 हटवल्यापासून दहशतवादी कारवायांना चाप बसू शकतो याची जाणीव झाल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत बिघडवण्याचा पाकचा प्रयत्नव आहे. यामुळेच भारतीय लष्कर देखील अलर्टवर आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तान सातत्याने सीमेवर गोळीबार करत आहे.

VIDEO: नारायण राणे भाजपमध्ये येणार की नाही? मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 23, 2019, 6:50 PM IST

ताज्या बातम्या