पाकचे खासदार फैझल जावेद खान यांनी ट्वीट करत या वृत्ताचे खंडन केले आहे. तर, पंतप्रधान एकदम ठिक असल्याचे ट्वीट केले आहे. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोसिस जॉनसन यांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर इम्रान खान यांनाही संसर्ग झाल्याचा दावा लंडनमधील न्यूज मीडियाने केला होता. मात्र अशा चुकीच्या आणि दिशाभूल करणार्या बातम्या न दाखवण्याचे आवाहन फैझल यांनी केले आहे.Imran khan test positive for corona virus #CoronaLockdown pic.twitter.com/FQQxuMcxbf
— Abdullah Manzoor (@abdullahirsh) March 27, 2020
'पाकमधील परिस्थिती चिंताजनक पण आमचे प्रयत्न सुरू' दरम्यान, पाकिस्तानच्या पत्रकारांशी बोलताना फैझल यांनी, कोरोनामुळे परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, पैशाअभावी इराणची सीमा व तफ्तान येथे येणार्या यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा देता येत नाहीत, असेही सांगितले. पाकिस्तानमध्ये इराणमधील मोठ्या संख्येने यात्रेकरूंना या विषाणूची लागण झाली होती. त्यांच्या मते, जेव्हा पहिली घटना उघडकीस आली तेव्हा जाफर मिर्झा तेथे गेले आणि त्यांनी आपला अहवाल पंतप्रधानांना सादर केला. हा अहवालात अत्यावश्यक सुविधांची तीव्र कमतरता दिसून आली. निधीअभावी बलुचिस्तानची अवस्था तशीच असल्याचेही ते म्हणाले. परदेशी निधी उपलब्ध करून देणार पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने परदेशी देशांकडून मदत मागवून निधी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा फारुकी यांनी, पंतप्रधान इमरान खान यांनी विकसनशील देशांना असलेल्या कर्जावरील व्याज दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या साथीच्या पार्श्वभूमीवर हे स्थगित केले जावे असेही म्हटले आहे. लंडन आणि कॅनडामधील वाढती प्रकरणे लक्षात घेता पाकने येथून जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असूनही पाकिस्तानमध्ये बऱ्याच ठिकाणी पूर्वीप्रमाणे नमाज पठण केले जाते.News regarding PM Imran Khan tested positive for #Covid19 is NOT True. Please refrain from spreading Fake News. Arise TV please correct.
— Faisal Javed Khan (@FaisalJavedKhan) March 27, 2020
May ALLAH keep everyone safe.
Prayers 🙏
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona