नवी दिल्ली, 30 मार्च : पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांचा एकएक शिलेदार साथ सोडत असल्याने पाकिस्तानातील इम्रान खान सरकार पडणे जवळपास निश्चित झाले आहे. आजही इम्रान खान यांचे दोन मंत्री त्यांना सोडून गेले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांनी आज सीक्रेट लेटर बॉम्ब शेअर करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की त्यांचे सरकार पाडण्यात परदेशी शक्तींचा हात आहे. नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकारांना भेटणार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
या बैठकीत ते त्या पत्राचाही खुलासा करतील ज्यात त्यांनी दावा केला आहे की, त्यांचे सरकार पाडण्यात परकीय शक्तीचा हात आहे. आपले सरकार पाडण्यासाठी परकीय शक्ती लॉबिंग करत असल्याचा दावा त्यांनी नुकताच केला असून त्यांच्याकडे याबाबत सबळ पुरावे आहेत. खासदार आणि पत्रकारांच्या भेटीत इम्रान खान याबाबतचे महत्त्वाचे पुरावे सादर करतील, असे मानले जात आहे.
दरम्यान, इम्रान खान संध्याकाळी देशाला संबोधित करणार असून या भाषणात त्यांच्या राजीनाम्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. इम्रान खान आज देशाला संबोधित करणार असल्याची माहिती देशाचे गृहमंत्री शेख रशीद यांनी दिली आहे. याआधी इम्रान खान यांनी परराष्ट्र धोरण म्हणून हे पत्र सार्वजनिक करणार नसल्याचे सांगितले असले तरी आता ते नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि पत्रकारांना दाखविण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा! मुंबई हल्ल्याबाबत इम्रान खान यांच्यासमोर दिली कबुली
फ्लोअर टेस्टपूर्वी राजीनामा जाहीर करणार
या संपूर्ण घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला सांगितले की, इम्रान खान संध्याकाळी देशाला संबोधित केल्यानंतर राजीनामा देतील. इम्रान खान देशाला संबोधित करणार असून त्यातच राजीनामा जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना नॅशनल असेंब्लीच्या फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागणार नाही. त्याआधी राजीनामा देणार आहेत. इम्रान खान मुताहिदा क्वामी मूव्हमेंट-पाकिस्तान (MQM-P) चे नेते खालिद मकबूल सिद्दीकी आणि बलुचिस्तान अवामी पार्टीचे खालिद मगसी यांचे गुप्त पत्र देखील शेअर करणार आहेत. मात्र, पाकिस्तानी पत्रकार वजाहत काझमी यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हे पत्र पाहण्यासाठी निमंत्रित केले नसल्याचे म्हटले आहे.
Pakistan PM Imran Khan | इम्रान खान यांचा निरोप निश्चित, फक्त प्रतीक्षा बाकी! 'हे' असतील पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान
सरन्यायाधीशांना पत्र दाखवायला तयार
येथे जिओ न्यूजने वृत्त दिले आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे धमकीचे पत्र पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमर अता बंदियाल यांना देखील दाखवण्यास तयार आहेत. फवाद चौधरी म्हणतात की या पत्राची पोहोच सिव्हिल मिलिटरीतील काही निवडक लोकांपर्यंत मर्यादित आहे. विशेष म्हणजे 27 मार्चच्या रॅलीत इम्रान खान म्हणाले होते की, त्यांच्याकडे अशी पत्रे आहेत ज्यावरून हे सिद्ध होते की त्यांचे सरकार पाडण्यासाठी विदेशी शक्ती किती लॉबिंग करत आहे. ते म्हणाले की, हे पत्र विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या खूप आधीचे आहे. याचाच अर्थ इम्रान खान सरकार पाडण्याची तयारी फार पूर्वीपासून केली जात होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.