पाक बिथरला : इम्रान खान यांनी दिली अणुयुद्धाची धमकी, महासत्तेलाही दिला हा इशारा

पाक बिथरला : इम्रान खान यांनी दिली अणुयुद्धाची धमकी, महासत्तेलाही दिला हा इशारा

G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक मोठं विधान केलं आहे.

  • Share this:

इस्लामाबाद (पाकिस्तान), 26 ऑगस्ट : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप Donald trump आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi यांची G7 Summit च्या पार्श्वभूमीवर एकीकडे चर्चा झाली असताना पाकिस्तान मात्र बिथरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट अणुयुद्धाचीच धमकी अप्रत्यक्षपणे दिली आहे. G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan इम्रान खान यांनी एक मोठं विधान केलं आहे. फक्त भारताबद्दलच नाही तर जगातल्या महासत्तांनाही त्यांनी या विधानातून इशारा दिला आहे. 'जर वाद वाढला तर लक्षात ठेवा दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत. अणुयुद्धात कोणीही विजेता नसतो आणि त्याचे परिणाम जागतिक असतात. महासत्तांची यात मोठी जबाबदारी आहे. त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा देवो अगर न देवो पाक कुठल्याही गोष्टींची तमा बाळगणार नाही', असं इम्रान खान म्हणाले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत आपण काश्मीरप्रश्न मांडणार आहोत, असंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे. येत्या 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदींच्या नंतर इम्रान खान यांचं भाषण होणार आहे.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 भारताने रद्द केलं, त्यानंतर पाकिस्तान हडबडला. प्रथम संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत पाकने चीनच्या मदतीने हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला.

संबंधित - पाकिस्तान UN आमसभेतच काश्मीरप्रश्न मांडणार, मोदींच्या नंतर होणार इम्रानचं भाषण

पण हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं बहुतेक सर्व राष्ट्रांनी मान्य केल्याने पाकिस्तानचा प्रयत्न निष्फळ ठरला. आता इम्रान खान संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलवावी असा तगादा पाकिस्तानने त्यांचं मित्रराष्ट्र असलेल्या चीनच्या मदतीने लावून धरला होता. भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तो पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि भारताला अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानने पूर्ण प्रयत्न केले. पण त्यात या देशाला अपयश आलं.

हे वाचा  - 'मोदी उत्तम इंग्लिश बोलतात पण....' ट्रंप यांच्या 'या' वाक्यावर मोदींनी दिली टाळी

दरम्यान फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे होणाऱ्या जी7 शिखर परिषदेच्या आधी नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. चर्चेनंतर एकत्रित प्रेस कॉन्फरन्सही दोन नेत्यांनी घेतली.काश्मीर संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी केवळ काश्मीरच नव्हे तर भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील सर्व प्रश्न हे द्विपक्षीय असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. काश्मीर संदर्भात पत्रकारांनी विचारले असता मोदी म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक प्रश्न आहेत. काश्मीर हा त्यापैकी एक आहे. हे सर्व प्रश्न द्विपक्षीय आहेत. या विषयावर आम्हाला अन्य कोणत्याही देशाला त्रास द्यायचा नाही.

संबंधित बातमी - PM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी!

या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन्ही नेत्यांनी काश्मीरसह सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी हिंदीमध्ये उत्तरं दिली. त्यांच्या उत्तरांचा  तिथल्या तिथले अनुवाद करण्यात येत होता. अशाच  एका प्रश्नाचं उत्तर हिंदीतून देताना मोदी म्हणाले, "आमच्यामध्ये अनेक विषयांची चर्चा झाली आणि होत राहील. आम्हाला आपसात अशीच चर्चा करू द्या. त्यातून जे निष्पन्न होईल ते आम्ही तुम्हाला सांगूच." याचा अनुवाद ऐकायच्या आधीच ट्रंप विनोदाने म्हणाले, "हे खरोखर उत्तम इंग्रजी बोततात पण... त्यांना फक्त बोलायचं नाहीये."

डोनाल्ड ट्रंप यांच्या या वाक्यावर जोरदार हशा पिकला. मोदींनीसुद्धा ट्रंपना दाद देत त्यांना हातावर जोरदार टाळी दिली. ट्रंप- मोदी यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

फ्रान्स(France)मध्ये सुरु असलेल्या जी-7 शिखर परिषदेत (G7 Summit) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump)यांची चर्चा झाली.

संबंधित बातमी - पाकिस्तानला 440 व्होल्टचा झटका; काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

---------------------------------

VIDEO : पुण्यात लष्करी वेशात फिरतोय माथेफिरू, घरात घुसून मुलींवर करतोय विनयभंग

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 26, 2019, 9:17 PM IST

ताज्या बातम्या