लाहोर, 5 ऑक्टोबर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना (Pakistan PM Imran Khan is eager to talk to US President Joe Biden) काहीही करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर बोलायचं आहे. आतापर्यंत एकदाही या दोघांचं फोनवर (No direct telephonic conversation) थेट संभाषण झालेलं नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले इम्रान खान हे बायडेन यांच्यासोबत बोलण्यासाठी आकाश-पातळ एक करू पाहत आहेत.
इम्रान खान अस्वस्थ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारल्यानंतर जो बायडेन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन कॉल केला होता. जगातील इतर अनेक देशांच्या पंतप्रधानांसोबत आणि राष्ट्रप्रमुखांसोबत बायडेन यांची बातचित झाली. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मात्र फोन करणं बायडेन यांनी टाळलं आहे.
या कारणासाठी पाकिस्तानकडे दुर्लक्ष
अमेरिकेने जाणीवपूर्वक इम्रान खान यांना फोन करणं टाळलं असावं, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. पाकिस्तान सातत्यानं तालिबानला मदत करत आलं आहे. अमेरिकेची अफगाणिस्तानमध्ये सत्ता असतानादेखील पाकिस्तानमध्येच अनेक तालिबानी नेते आश्रय घेत होते. अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतरही जगातील अनेक देश तालिबान सरकारला मान्यता देत नाहीत. मात्र पाकिस्ताननं तालिबान सरकारला मान्यता देण्यात घाई केली. त्याचप्रमाणं चीनसोबत अनेक कारवायांमध्ये पाकिस्तान सहभागी असल्याचा संशय अमेरिकेला आहे. या कारणामुळे आपली नाराजी दर्शवण्यासाठीच जो बायडेन यांनी इम्रान खान यांना फोन करणं टाळल्याची चर्चा आहे.
हे वाचा - धोक्याची घंटा! पाकिस्तान-अफगाण सीमेवर भरतोय शस्त्रास्त्रांचा ‘बुश बाजार’
या व्यक्तीकडे दिली जबाबदारी
जो बायडेन यांनी आपल्याला फोन करावा, यासाठी त्यांना तयार करण्याची जबाबदारी इम्रान खान यांनी अमेरिकेतील एका व्यक्तीकडे सोपवल्याची माहिती आहे. ही व्यक्ती बायडेन यांची मित्र असून पाकिस्तानी-अमेरिकी नागरिक आहे. मात्र सध्या तरी जो बायडेन इम्रान खान यांना फोन करण्याची शक्यता धूसर असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, India, Joe biden, Pakisatan