VIDEO : इम्रान खान यांच्या पूर्वपत्नीनं केलं मोदींचं कौतुक; पाकिस्तानला 'या' शब्दांत घरचा आहेर

VIDEO : इम्रान खान यांच्या पूर्वपत्नीनं केलं मोदींचं कौतुक; पाकिस्तानला 'या' शब्दांत घरचा आहेर

'जिथे जिथे मोदी जातात तिथे त्यांना मान मिळतो. त्यांना UAE मध्ये मेडल मिळालं तर तुम्हाला आता त्रास होतोय. पण तुम्ही भिका मागत फिरता...'

  • Share this:

इस्लामाबाद, 30 ऑगस्ट : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान Imran Khan यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान Reham Khan यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra modi यांचं कौतुक करत पाक सरकारवर ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे त्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानऐवजी भारताची तळी कशी उचलली जात आहेत त्याबद्दल इम्रान खान यांना रेहम यांनी या व्हिडिओतून कडक शब्दांत प्रश्न विचारले आहेत. रेहम खान यांनी Twitter वरून हा Video शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये रेहम म्हणतात, "आज मोदी सरकारवर लोक का प्रेम करत आहेत, त्यांच्याबरोबर का संबंध तुटू नयेत असं इतरांना वाटतंय... कारण त्यांची अर्थव्यवस्था बळकट आहे. सौदीमध्ये मोदी गेले, तिथे त्यांना मान मिळाला. सौदीने भारतात गुंतवणूक केली, ब्रेग्झिटनंतरचा UK भारताबरोबर आहे. अमेरिकेला भारतातच रस आहे. जिथे जिथे मोदी जातात तिथे त्यांना मान मिळतो"

पाकिस्तानबद्दल बोलताना रेहम यांनी थेट शब्दांत इम्रान खान सरकारला खडसावलंय, "त्यांना UAE मध्ये मेडल मिळालं तर तुम्हाला आता त्रास होतोय. पण तुम्ही भिका मागत फिरता... त्यांच्या पायातल्या जोड्यासारखं वागता मग कसे ते तुमचा मान राखणार?"

हेही वाचा - इम्रान खानची भारतात 5 मुलं, समलैंगिक संबंधही ठेवले; पूर्वपत्नीचा आरोप

काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानचा मुद्दा असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केल्याने पाकिस्तान पु्न्हा एकदा तोंडावर पडले. तेव्हासुद्धा रेहम खान यांनी पाकिस्तानला घरचा आहेर दिला होता. रेहम खान यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात खळबळजनक खुलासा केला होता. रेहम यांनी केलेल्या या आरोपामुळे पाकिस्तानच्या विशेषत: इम्रान खान यांच्या अचडणी वाढल्या आहेत.

संबंधित - मोदींपुढे इमरान खान झुकले; पाकच्या पंतप्रधानावर माजी पत्नींच्या आरोपाने खळबळ!

रेहम खान यांनी पाकचे पंतप्रधान आणि माजी पतीवर असा आरोप केला की, त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक गोपनीय करार केला. रेहम यांच्या दाव्यानुसार या करारात भारताच्या पंतप्रधानांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि केवळ यामुळेच इम्रान भारताविरुद्ध कोणतंही ठोस पाऊल उचलत नाहीत. आम्हाला सुरुवातीपासून असं सांगण्यात आलं आहे की, काश्मीर पाकिस्तानचे होईल. पण मी म्हणते की काश्मीर विकलं गेलं आहे", असा खळबळजनक दावा रेहम यांनी केल्याचे वृत्त खलील टाईम्सने दिले आहे.

------------------------------

SPECIAL REPORT : काश्मीर मुद्यावरून संरक्षणमंत्र्यांनी पाकला चांगलंच ठणकावलं, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या