Home /News /videsh /

VIDEO: 'क्या हैं ये...? जो भी हैं...' LIVE TV वर देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान इम्रान खान अडखळतात तेव्हा...

VIDEO: 'क्या हैं ये...? जो भी हैं...' LIVE TV वर देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान इम्रान खान अडखळतात तेव्हा...

Imran Khan brain fade moment: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण सुरू होतं. तेव्हा एक क्षण असा आला की, ते अक्षरशः ब्लँक झाले. वाक्य मध्येच विसरले. पाहा VIDEO

इस्लामाबाद, (पाकिस्तान) 5 मार्च: जेव्हा आपण एखाद्यावेळी एका रूममध्ये जातो, त्यावेळी आपण इथं का आलोय हे क्षणभर विसरतो. एखादया व्यक्तीला काही महत्त्वाची गोष्ट ऐनवेळी सांगायला विसरतो. ओळीच्या मध्यावर येताच आपली शब्दांची ट्रेन भरकटते, असे प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा येतात. पण नेतेमंडळींच्या भाषणात तेही पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीकडून हे असं काही झालेलं दिसलं तर व्हायरल तर होणारच! असाच काहीसा प्रसंग पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan brain fade moment) यांच्याबाबतीत दूरचित्रवाणी आणि व्टिटरवरुन थेट प्रक्षेपण सुरू असताना घडला. डॉनच्या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान हे गुरुवारी रात्री थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेला बुधवारी झालेल्या सिनेट निवडणुकीनंतर (Senate Election) देशातील राजकीय परिस्थिती आणि विरोधकांनी घातलेला गोंधळ याविषयी माहिती देत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटवर (पीडीएम PDM) लोकशाहीची खिल्ली उडवली आहे, असे सांगत टिका केली. तसेच गुप्त मतपत्रिकेव्दारे सिनेट निवडणुका घेऊन पैसे कमवणाऱ्यांचे संरक्षण करणाऱ्यांबाबत त्यांनी ईसीपीला आवाहन केले. याविषयी बोलणं आणि स्पष्टीकरण देणं महत्वाचं आहे, कारण आपल्या देशातील समस्या कोणत्या प्रकारच्या निवडणुका झाल्या त्यावरुनच समजल्या जाऊ शकतात, असे त्यांनी संबोधनाच्या सुरुवातीलाच सांगितलं. सिनेट निवडणुकीपूर्वी घोडेबाजाराच्या घोटाळ्याचे व्हिडीओ लिक झाल्याचे नमूद करत भ्रष्टाचाराने पाकिस्तानमधील तरुणांसमोर कोणते उदाहरण उभे केले, असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले. भाषणादरम्यान, ते काहीसे अडखळल्याकडे (Brain Fade) व्टिटरने लक्ष वेधले. याबाबत पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी व्टिट करत पंतप्रधान मध्यभागी बोलताना हे वाक्य विसरताना दिसत आहेत. ये जो सारे... बडे बडे...बडे...बडे क्या बात है...जो भी है, अशी प्रतिक्रिया दिली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते काही तरी विचित्रपणे संबोधित होते. या संबोधनात पंतप्रधान इम्रान खान पीडीएमच्या नेतृत्वाबाबत थेट बोलताना म्हणाले की माझा एक संदेश आहे. जर माझ्याकडील पॉवर गेली तर त्याने काय फरक पडेल? मी कोणतेही कारखाने उभारले किंवा माझ्या नातेवाईकांना मोठी पदे दिली? मी मेफेअरमध्ये मोठी घरे खरेदी केली आहात का? मी माझ्या स्वतःच्या घरात राहतो. सरकार माझ्या सुरक्षेचा आणि प्रवासाचा खर्च करते. मी सत्तेत नसल्यास मला काही फरक पडणार नाही. परंतु माझा तुम्हा सर्वांसाठी संदेश आहे की मी विरोधात बसलो किंवा असेंब्लीच्या बाहेर बसलो तरी मी तुमच्यातील कोणालाही सोडणार नाही, जो पर्यंत तुम्ही या देशाचे पैसे परत करीत नाही तोपर्यंत. हे वाचा - राजघराण्यापासून वेगळं झालेल्या प्रिन्स हॅरीने वर्षभरानंतर केलं मोठं वक्तव्य इम्रान खान म्हणाले, की मी जर संसदेबाहेर असेल तर मी देशातील पैशांचे चोरांपासून रक्षण करण्यासाठी देशवासीयांसह रस्त्यावर उतरेन.
First published:

Tags: Imran khan, Pakistan

पुढील बातम्या