भारतासोबत युद्ध झालं तर पाकिस्तानचा पराभव होणार; इम्रान खान यांची कबुली

युध्दाने कधीही प्रश्न सुटत नाहीत आणि कुणाचं भलं झालं नाही. पण पारंपरिक युद्ध झालंच तर त्यात पाकिस्तानचा परभव होत असेल तर आमच्या समोर दोन पर्याय उतरतील. एक म्हणजे आत्मसमर्पण करणं आणि दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढणं.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 05:44 PM IST

भारतासोबत युद्ध झालं तर पाकिस्तानचा पराभव होणार; इम्रान खान यांची कबुली

इस्लामाबाद 15 सप्टेंबर : काश्मीर मधून 370 कलम हटविल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारतावर सातत्याने तोंडसुख घेताहेत. युद्धाची धमकी देणं, अणुयुद्धाचा वारंवार उल्लेख करणं असं करून ते जगाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांनकडे सर्व जगानं दुर्लक्ष केलंय. त्यामुळे इम्रान खान यांचा अधीकच जळफळाट होतोय. अल जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतावर आगपाखड करत असतानाच पारंपरिक युद्ध झाल्यास पाकिस्तान भारतासोबत जिंकू शकणार नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच दिलीय. इम्रान खान म्हणाले, आम्हाला युद्ध नकोय. आम्ही कधीही पहिले अणुयुद्ध सुरू करणार नाही. मी शांततेचा पुरस्कर्ता आहे. युध्दाने कधीही प्रश्न सुटत नाहीत आणि कुणाचं भलं झालं नाही. पण पारंपरिक युद्ध झालंच तर त्यात पाकिस्तानचा परभव होत असेल तर आमच्या समोर दोन पर्याय उतरतील. एक म्हणजे आत्मसमर्पण करणं आणि दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढणं. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचे परिणाम हे अतिशय भयानक असतात असं म्हणत त्यांनी अणुयुद्धाची धमकीही दिली.

युतीच्या वादावर 'तुझं-माझं जमेना', भाजपनंतर शिवसेनाही स्वबळावर लढण्याच्या तयरीत?

संयुक्त राष्ट्र आणि संस्थांशी आम्ही संपर्क केला असून त्यांनी भारतावर दबाव आणावा असंही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रानं या आधीच काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय तोडगा काढावा असं म्हणत पाकिस्तानची मागणी फेटाळून लावलीय. तर अमेरिकेनेही हा प्रश्न शांततेच्याच मार्गाने सोडवावा असं म्हटलंय. त्यामुळे या प्रश्नाचं आंतराष्ट्रीयीकरण करण्याचा पाकिस्तानचा डाव उलटला आहे.

त्याचमुळे इम्रान खान हे पाकिव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन चिथावणीखोर भाषणं करत आहेत. एलओसीवर केव्हा जायचं हे मी काश्मिरी तरुणांना सांगणार आहे असं त्यांनी शुक्रवारी मुजफ्फराबादमध्ये भाषण करताना सांगितलं होतं.

पुण्यात पोपटपंची.. CM म्हणाले, होंर्डिंग लावले म्हणजे तिकीट मिळेलच असं नाही!

Loading...

'तर पाकिस्तानचे होतील तुकडे'

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सीमेवर होत असलेली घुसखोरी आणि दहशतवादाचं समर्थन करण्यावरून ठणकावलं आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. त्यांनी हे थांबवलं नाही तर पाकचे तुकडे होण्यापासून जगातील कोणतीच ताकद वाचवू शकणार नाही असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. पाकिस्तानी घुसखोरांच्या कुरापती सुरू राहिल्या तर त्यांना भारतीय लष्कर सोडणार नाही. शनिवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पाकिस्तानची प्रशंसा करण्यामागे पवारांचा डाव?, शिवसेनेनं दिली 'ही' प्रतिक्रिया

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी नागरिकांनी जाऊ नये असं म्हटलं होतं. त्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, इमरान खान यांनी त्यांच्या नागरिकांना चांगला सल्ला दिला. कारण ते इकडे आलेच तर त्यांना मागे जायला भारतीय सैनिक वेळही देणार नाहीत असा सज्जड दम त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...