होय, भारताने एअर स्ट्राईक केला; इम्रान खान यांनी अमेरिकेत केले मान्य!

होय, भारताने एअर स्ट्राईक केला; इम्रान खान यांनी अमेरिकेत केले मान्य!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर हे मान्य केले आहे की भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता.

  • Share this:

न्यूयाॉर्क, 24 सप्टेंबर: जम्मू-काश्मीर(Jammu and Kashmir)मधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राईक (Air Strike)केला होता. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी ठार झाले होते. भारताने हा हल्ला करण्याआधी आणि झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाला विश्वासात घेतले होते. याउटल पाकिस्तानने मात्र सातत्याने अशा प्रकारचा कोणताही हल्ला झाला नसल्याचे म्हटले होते. पण आता खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर हे मान्य केले आहे की भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकी दौऱ्य़ावर आहेत. सोमवारी त्यांनी काऊंसिल ऑफ फॉरेन रिलेशन (Council on Foreign Relations) येथे अनेक विषयांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी बालाकोट एअर स्ट्राईक झाल्याचे मान्य केले. विशेष म्हणजे आतापर्यंत पाकिस्तानने सातत्याने ही गोष्ट फेटाळून लावली होती. त्यांनी कलम 370 (Article 370)हटवण्यावर देखील मत व्यक्त केले. या कार्यक्रमात इम्रान खान यांना अनेक अडचणीच्या प्रश्नांना तोड द्यावे लागले. यातील अनेक प्रश्न हे भारताशी संबंधित होते. भारताशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी खान यांनी दहशतवाद रोखण्यासाठी आलेल्या स्वत:च्या अपयशाचे खापर अमेरिकेवर फोडण्यास सुरुवात केली. आर्श्चय म्हणजे हे बोलताना खान हे विसरले की ते अमेरिकेत बसून अमेरिकेवर टीका करत आहेत. खान यांनी अमेरिकेने दहशतवाद पोसल्याचा आरोप केला.

होय एअर स्ट्राईक झाला...

एका प्रश्नाला उत्तर देताना इम्रान म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे आश्वासन दिले आहे की आम्ही दहशतवाद्यांची सर्व कॅम्प नष्ट करू. पण प्रश्न हा आहे की विश्वासाचे वातावरण नाही. दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची गेल्यावर्षी बैठक होणार होती. पण भारताने ही बैठक रद्द केली. आम्हाला वाटले होते की निवडणुकीनंतर या दृष्टीकोणात बदल होईल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही भारताकडून पुरावे मागितले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे सिद्ध करणारा एक तरी पुरावा द्या अशी विनंती आम्ही केली होती. पण पुरावा देण्याऐवजी भारताने आमच्यावरच बॉम्ब टाकले. त्यानंतर आम्ही त्यांचा एक वैमानिक देखील कोणताही प्रश्न न विचारता परत केला. भारताला असे वाटते की आम्ही कमकूवत आहोत आणि ते आम्हाला FATF ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारताने जेव्हा कलम 370 रद्द केले तेव्हा आम्हाला याची जाणीव झाली की मोदी सरकार RSSचा अजेंडा राबवत आहे. काश्मीर प्रश्नावर जेव्हा अन्य देश हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भारत म्हणतो की हा द्विपक्षीय मुद्दा आहे. आम्ही केवळ पाकिस्तानशी चर्चा करू. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मिरी लोकांना घरांमध्ये बंद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मी भारतासोबत कशी चर्चा करू, असे इम्रान खान म्हणाले. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मागणी करतो की त्यांनी काश्मीरमधून संचारबंदी उठवावी.

VIDEO : हेल्मेट घालून केली चोरी; विदेशी दारूसह 50000 लुटतानाची दृश्य CCTV मध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 07:52 AM IST

ताज्या बातम्या