अवघ्या काही दिवसातच पाकिस्तानचा माज उतरला; भारतासमोर टेकले गुडघे!

अवघ्या काही दिवसातच पाकिस्तानचा माज उतरला; भारतासमोर टेकले गुडघे!

पाकिस्तानचा माज फार दिवस टिकला नाही.

  • Share this:

इस्लामाबाद, 03 सप्टेंबर: जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir)साठीचे कलम 370 रद्द केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तान(Pakistan)ने अनेक टोकाचे निर्णय घेतले. पण आता तेच निर्णय त्यांच्यावर उलटल्यानंतर पाकिस्तानवर पुन्हा एकदा भारता(India)समोर गुडघे टेकण्याची वेळ आली आहे. काश्मीर आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर पाकने भारतासोबतचे सर्व व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानचा हा माज फार दिवस टिकला नाही. त्यांची हा माज काही दिवसातच उतरला. जीवनावश्यक औषधांची कमतरता जाणवू लागल्याने पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू केला आहे. पाकिस्तान सरकारने भारतात तयार झालेल्या जीवनावश्यक औषधां(Life Saving Medicines)च्या आयतीला परवानगी दिली आहे.

भारतात तयार झालेल्या औषधांच्या आयात आणि निर्यातीला पाकिस्तानच्या व्यापर मंत्रालयाने सोमवारी परवानगी दिली. यासंदर्भातील एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारतात तयार झालेली औषधांची आयात करत असतो. पाकिस्तानला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधांसाठी तो भारतावर अवलंबून आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या 16 महिन्यात पाकिस्तानने भारताकडून 250 कोटींहून अधिक फक्त रेबिज आणि अन्य औषधांची खरेदी केली आहे.

औषधांचा तुटवडा होणार होताच...

पाकिस्तानमध्ये औषधांचा तुटवडा होणार यासंदर्भातील वृत्त डॉन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. भारताशी व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथील संघटनेने म्हटले होते की, भारतातून येणारा कच्चा माल तसेच औषधांचा कधीही तुटवडा निर्माण होऊ शकतो. जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत आयातीमध्ये सवलती दिल्या पाहिजे असे EFPने म्हटले होते. आता पाकिस्तानकडे पर्याय नसल्यामुळे त्याने पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू केला आहे.

घोडागाडी शर्यतीत झाला अपघात, रस्ता सोडून लोकांमध्ये घुसले घोडे; थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 04:08 PM IST

ताज्या बातम्या