मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सामान्य जनता भुकेली अन् पाकिस्तानी आर्मी अधिकाऱ्यांची उधळपट्टी! लोकांनी केलं ट्रोल

सामान्य जनता भुकेली अन् पाकिस्तानी आर्मी अधिकाऱ्यांची उधळपट्टी! लोकांनी केलं ट्रोल

पाकिस्तानी आर्मी ऑफिसर

पाकिस्तानी आर्मी ऑफिसर

हे फोटो 200 मिलिटरी एलिट क्लास गोल्फ कोर्सपैकी एक असलेल्या गोल्फ कोर्सचे आहेत. प्रत्येक कोर्स 1900 एकर क्षेत्रफळावर पसरलेला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • New Delhi, India

    इस्लामाबाद: एकीकडे पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकारी ऐषोरामात जीवन जगण्यात व्यस्त आहेत. पाकिस्तानी वंशाच्या एका बॅरिस्टरनं सर्वोच्च लष्करी जनरल्सवर त्यांच्या ऐषोआरामी जीवनशैलीबद्दल आणि देशाला आर्थिक संकटाचा सामना करताना त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलतींबद्दल टीका केली आहे.

    बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, लोकप्रिय ब्रिटिश-पाकिस्तानी बॅरिस्टर खालिद उमर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर काही फोटोंचा एक कोलाज शेअर केलं आहे. या फोटोंमध्ये पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसाठी तयार केलेला गोल्फ कोर्स दिसत आहे. खालिद यांनी केलेल्या ट्विटनुसार, हे फोटो 200 मिलिटरी एलिट क्लास गोल्फ कोर्सपैकी एक असलेल्या गोल्फ कोर्सचे आहेत. प्रत्येक कोर्स 1900 एकर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. बॅरिस्टर उमर यांनी ट्विटरमध्ये पुढे म्हटलं आहे की, 'येथील गोल्फ स्टिकची किंमत एका मजुराच्या मासिक पगारापेक्षा जास्त आहे. हा जनरल्सचा 'पाकिस्तान' आहे जो सध्या डिफॉल्टच्या औपचारिक घोषणेच्या मार्गावर आहे.'

    मित्रांनीच केला विश्वासघात; मैत्रिणीला मोबाईल देण्याचं आमिष दाखवलं अन्.., सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ

    उमर यांनी बहुतेक पाकिस्तानी लोकांच्या मनातील विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, अशांत पाकिस्तानमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एका गटातील लोक सर्व विशेषाधिकारांचा उपभोग घेत आहेत तर दुसरा गट आर्थिक ओढाताण सहन करत आहे. पाकिस्तानमध्ये, सरकारनं कामगारांसाठी दरमहा 25 हजार रुपये (भारतीय रुपयांमध्ये 7 सात 352 रुपये) किमान वेतन निर्धारित केलेलं आहे. देशात सध्या गोल्फ किटची किंमत लाखो रुपये आहे.

    बॅरिस्टरच्या खालिद उमर यांच्या ट्विटवर कमेंट करताना माजी भारतीय लष्कर प्रमुख वेद मलिक म्हणाले की, पाकिस्तानी लष्कर देशातील राजकारण आणि सत्तेवरील आपली पकड का सोडणार नाही याचं हे विशेषाधिकार एक प्रमुख कारण आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी अधिकाऱ्यांना अनेक सुविधा मिळतात. पण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना जमिनीचा मोठा तुकडा मिळतो.

    गिळायला त्रास होत होता म्हणून डॉक्टरकडे नेलं, घश्यात आढळल्या 100 च्या 2 नोटा!

    प्रमुख संरक्षण विश्लेषक असलेल्या आयशा सिद्दिकी आपल्या 'Military Inc: Inside Pakistan Military Economy' या पुस्तकात लिहितात की, पाकिस्तानमधील लष्कराकडे देशाचा 12 टक्के भूभाग आहे. ज्यापैकी दोन तृतीयांश जमीन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मालकीची आहे.

    या वर्षी जानेवारीमध्ये, पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी सुचवलं होतं की, आयएमएफच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला मजुरांचं किमान वेतन 25 हजारांहून 35 हजार पाकिस्तानी रुपये करावं लागेल. त्यानंतर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही मजूर आणि कामगारांचे किमान वेतन 35 हजार रुपये करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. कामगार वर्गावरील आर्थिक भार कमी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. दूरगामी पावलंच सर्वसामान्यांना आर्थिक दलदलीतून बाहेर काढू शकतात, असंही ते म्हणाले होते. कमी परकीय चलन साठा, मंदावलेली आर्थिक वाढ, महागाई आणि चलनाचं घसरलेलं मुल्य यामुळे पाकिस्तानची स्थिती अत्यंत बिकट आहे. रोख पैशांची चणचण असलेल्या देशात मालाची आयात करणं महाग ठरत आहे.

    गेल्या काही काळात, सामान्य पाकिस्तानी नागरिक पिठासाठी भटकत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कारण, किंमती वाढल्या आणि गिरण्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे गव्हाच्या पिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या शिवाय, देशातील आर्थिक संकटही अधिक गडद होत आहे आणि उत्पन्नात असमानत आहे.

    First published:

    Tags: Pakistan