मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तानला मोठा झटका, इस्लामिक संस्थांच्या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा नाही

पाकिस्तानला मोठा झटका, इस्लामिक संस्थांच्या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा नाही

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर OIC च्या बैठकीत चर्चा केली जाईल असं छातीठोकपणे सांगितलं होतं मात्र आता तोंडावर पडल्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर OIC च्या बैठकीत चर्चा केली जाईल असं छातीठोकपणे सांगितलं होतं मात्र आता तोंडावर पडल्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर OIC च्या बैठकीत चर्चा केली जाईल असं छातीठोकपणे सांगितलं होतं मात्र आता तोंडावर पडल्याची वेळ आली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर - ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) या इस्लामी देशांच्या संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची शुक्रवारी नायजरची राजधानी नायमीमध्ये बैठक झाली. शनिवारी देखील ही बैठक पार पडणार आहे. ओआयसीच्या (Organisation of Islamic Cooperation) काउन्सिल ऑफ फॉरेन मिनिस्टर्सच्या (CFM) बैठकीचा अजेंडा संघटनेने अरबी आणि इंग्रजीतल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीच्या अजेंडामध्ये काश्मीरचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्याचा मुद्दा या बैठकीत जोरकसपणे मांडण्याची आशा असलेल्या पाकिस्तानच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. अजेंड्यावर हा मुद्दा नसल्याचं स्पष्ट झालं असतानाही पाकिस्तानी अधिकारी आपलं अपयश लपवण्यासाठी सारवासारव करत आहेत.

इस्लामी देशांतील शक्तिशाली अशा सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीशी पाकिस्तानचे संबंध सध्या बिघडल्यामुळे ओआयसीच्या अजेंड्यात काश्मीरचा मुद्दा नसल्याचं पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र डॉननी म्हटलंय. पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहे आणि त्यांनी कायम काश्मीरला मुस्लिम धर्माशी जोडूनच पाहिलंय त्यामुळे ओआयसीमध्ये पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा जोरजोरात मांडत असे. आता त्यांना या भूमिकेवर या संघटनेतील इतर मुस्लिम देशांचा पाठिंबा मिळालेला नाही. हे पाकचं अपयश आणि भारतीय मुत्सद्देगिरीचं यश आहे.

पाकची सारवासारव

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हाफिज चौधरींनी आठवड्यातील पत्रकार परिषदेत असा विश्वास व्यक्त केला होता की या बैठकीत काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला जोरदार पाठिंबा मिळेल.

ते म्हणाले, ‘ ओआयसीच्या (Organisation of Islamic Cooperation) अजेंड्यावरील सर्वांत जुन्या विवादास्पद मुद्द्यांपैकी एक काश्मीरचा मुद्दा आहे. ओआसीने अनेकदा काश्मीर मुद्द्याबद्दल भूमिका घेतली असून संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांनुसार या विषयावर तोडगा काढण्याची मागणी अनेक दशकांपासून केली आहे. जम्मू-काश्मीरसंबंधी कॉन्टॅक्ट ग्रुपची गेल्या 15 महिन्यांपासून बैठक घेतली आहे. यातील शेवटच्या बैठकीत भारतानी आपला निर्णय मागे घेऊन काश्मीरमधील मानवी मूल्यांचं रक्षण करावं असं ओआयसीने म्हटलं होतं.’ ओआयसीने स्पष्टपणे अजेंड्यावरच काश्मीरचा मुद्दा न घेतल्याने तोंडावर पडल्याने पाकिस्तानने अशी सारवासारव सुरू केली आहे.

कुरेशींच्या धमकीचा फटका 2 अरब डॉलर्सचा

या बैठकीत पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी पाकचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या बैठकीसाठी ते बुधवारीच नायजरला रवाना झाले आहेत त्या आधी ते पत्रकारांना म्हणाले, ‘ या बैठकीत मी काश्मीर आणि फ्रान्ससह इतर देशांतील इस्लामोफोबियाचा विषय चर्चेला मांडणार आहे. मुस्लिम देशांपुढील आव्हानांवर आम्ही चर्चा करू.’काश्मीरच्या मुद्द्यावर ओआयसी परराष्ट्रमंत्र्यांची बैठक बोलवण्यात संघटना टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुरेशींनी ऑगस्ट महिन्यात केला होता. सौदी अरेबियाने याविषयावर बैठक आयोजित केली नाही तर पाकिस्तान इस्लामी देशांची स्वतंत्र बैठक आयोजित करेल अशी धमकी कुरेशींनी तेव्हा दिली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे सौदी अरेबिया प्रचंड नाराज झाला होता. या घोडचुकीचा फटका पाकिस्तानला बसला आणि सौदी अरेबियानी दिलेलं 2 अरब डॉलर्सचं कर्ज पाकिस्तानला परत करावं लागलं होतं. आता बैठकीच्या अजेंड्यात काश्मीरचा मुद्दा नसल्याने पाकिस्तानला जोरदार झटका लागला आहे.

हे वाचा-असदुद्दीन ओवैसींनी 5 हिंदू उमेदवारांना दिलं तिकिट, असं असणार MIM चं समीकरण

भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय

काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून त्यामध्ये इतर देशांनी मध्यस्थी करू नये, अशी भारताची कायम भूमिका राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची काश्मीरबाबतची भूमिका अधिक स्पष्टपणे मांडण्यात आली. त्यांनी सौदी अरेबियासारख्या मुस्लिम देशांचे दौरे करून त्यांच्याशी असलेले भारताचे संबंध अधिक दृढ केले. भारताच्या या मुत्सदेगिरीमुळे पाकिस्तानी सीमेत शिरून सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतरही कोणीही अवाक्षरही काढलं नव्हतं. त्याचाच पुढचा भाग म्हणजे भारतीय मुत्सदेगिरीला चांगलं यश येत आहे. यूएईने तर पाकिस्तानी नागरिकांना नवा व्हिसा देणंही बंद केलंय.

First published:

Tags: Pakistan