पाकिस्तानचा पुन्हा एकदा PM मोदींना नकार; म्हणे तुम्ही मानवाधिकाराचे उल्लंघन केलं!

पाकिस्तानचा पुन्हा एकदा PM मोदींना नकार; म्हणे तुम्ही मानवाधिकाराचे उल्लंघन केलं!

भारताने जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी नाकारली.

  • Share this:

इस्लामाबाद, 28 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध मोहिम उघडली आहे. अर्थात जगातील अन्य कोणत्याही नागरिकांनी पाकिस्तानच्या भारताविरुद्ध मोहीमेची दखल घेतली नाही. कलम 370 रद्द केल्यावरून पाकिस्तानने आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यासाठी एअरस्पेस देण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान मोदी सौदी अरब दौऱ्यासाठी जात आहेत. य़ासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची भारताने विनंती केली होती. पण पाकिस्तानने चक्क भारताने जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी नाकारली.

पाकिस्तान रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ही पवानगी नाकारल्याचे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय हा मानवाधिकाराचे उल्लंघन आणि काळा दिवस असल्याचे आम्हाला वाटते, असे कुरैशी यांनी सांगितले. पाकिस्तानने काश्मिरी लोकांच्या समर्थनासाठी रविवारी काळा दिवस साजरा केला होता. पंतप्रधान मोदी आजपासून (सोमवार) सौदी अरबच्या दौऱ्यावर जात आहेत. येथे होणाऱ्या इंटरनॅशनल बिझनेस फोरममध्ये ते सहभागी होत आहेत. या निमित्ताने मोदी सौदीच्या नेत्यासोबत देखील चर्चा करतील.

हवाई क्षेत्राचा वापर करण्याची भारताची विनंती परवानगी फेटाळण्याचा ही पहिली वेळ नाही. भारताने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकने एअरस्पेस बंद केली होती. याआधी सप्टेंबर महिन्यात मोदींच्या परदेशी दौऱ्यासाठी पाकिस्तानने परवानगी फेटाळली होती. त्याआधी राष्ट्रपती रामनात कोविंद यांच्या परदेशी दौऱ्य़ासाठी पाकने असाच नकार दिला होता.

14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यानंतर भारताच्या हवाई दलाने बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक करत पाकला दणका दिला होता. तेव्हापासून पाकिस्तानने हवाई क्षेत्राचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. 27 मार्च रोजी पाकने नवी दिल्ली, बँकॉक आणि कुआलालाम्पूर वगळता अन्य विमानांसाठी हवाई क्षेत्र खुले केले होते. तर 16 जुलै रोजी सर्व नागरी विमानांसाठी हवाई क्षेत्र खुले केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 07:41 AM IST

ताज्या बातम्या