लाहोर, 24 फेब्रुवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असते. आता मात्र पाकच्या सरकारी अधिकाऱ्यांनी बुशरा बीबीसाठी दरवाजा उघडला नाही म्हणून अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी जवळ जवळ 20 सरकारी अधिकाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील देवस्थानच्या भेटीदरम्यान बुशरा बीबी यांच्या प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुशरा बीबी यांच्यासाठी जो दरवाजा उघडला नाही त्याला स्वर्गाचा दरवाजा असे म्हणतात.
वाचा-अमेरिका भारताला देणार 3 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र, उद्या होणार संरक्षण करार
मुख्य म्हणजे बुशरा या प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना न कळवता 20 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील पाकपट्टन जिल्ह्यातील बाबा फरीद यांच्या दर्ग्याजवळ गेल्या होत्या. यावेळी प्रोटोकॉलनुसार त्यांच्यासाठी दरवाजा उघडणे अधिकाऱ्यांना बंधनकारक होते. मात्र बुशरा न कळवता तेथे पोहचल्या होत्या, त्यामुळं दरवाजा उघडण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नव्हता. यामुळं बुशरा यांनी रागही व्यक्त केला होता. त्यानंतर 20 अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश इमरान खान यांनी दिले आहेत.
वाचा-'मायक्रोसॉफ्टशी भागीदारीसाठी आम्ही उत्सुक', मुकेश अंबानी-सत्या नडेला यांचा संवाद
दरम्यान, या सगळ्या प्रकरणाबाबत सुरक्षा विभागाचे मुख्य प्रशासक गुलजार हुसेन शहा यांनी, स्वर्गाचे दार तत्काळ उघडले नाही म्हणून बुशरा रागवल्या. याप्रकरणी 20 सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले आहे. बुशरा बीबी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची तिसरी पत्नी आहेत. पाकिस्तानमध्ये बुशराबाबत अनेक प्रकारची चर्चा आहे.
वाचा-विधानभवन परिसरात भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमक
पिंकी जादूगरनी
पाकिस्तानात बुशरा बीबी यांना पिंकी जादूगरनी नावानं ओळखलं जातं. त्यांनी जादूटोणा केल्याच्या अफवा नेहमीच तिथल्या सोशल मीडियावर पिकत असतात. बुशरा यांची प्रतिमा आरशात दिसतच नाही यापासून अनेक अफवा त्यांच्यासंदर्भात पसरवल्या गेल्या आहेत. खुद्द इम्रान खान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत पत्नी बुशरा यांच्या अध्यात्मिक ओढीविषयी आणि ताकदीविषयीचा उल्लेख केला होता. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं.