मुंबई, 16 जानेवारी: कोरोनाशी लढण्यासाठी भारत देश आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अखेर संपूर्ण देशात कोरोना लसीकरण (coronavirus vaccine) सुरू झाले आहे. देशामध्ये लसीकरणास सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित केले. संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी लसीकरणाचे अभियान सुरू झाले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आले आहेत. दरम्यान यावेळी आपला शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तानात परिस्थिती उलट आहे. त्याठिकाणी अद्याप लशीची उपलब्धता नाही आहे. शिवाय कोणतीही कंपनी पाकिस्तानला लस देण्यास तयार नाही आहे.
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, जगातील अनेक देशांनी कोरोनाशी लढण्यासाठी व्हॅक्सिनेशन सुरू केले आहे मात्र पाकिस्तानने अद्याप लशीचा बंदोबस्त केला नाही आहे. कोव्हिड-19 लस मागवण्यासाठी पाकिस्तानने अद्याप कोणतीही अंतिम ऑर्डर देखील दिली नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसंच कोणत्याही व्हॅक्सिन मॅन्यूफॅक्चररने व्हॅक्सिन पुरवण्यासाठी पाकिस्तानला मंजुरी दिली नाही आहे.
लसीकरणानंतर ‘या’ देशात 23 जणांचा मृत्यू, जगाला दिला इशारा!
या अहवालात असे नमुद करण्यात आले आहे की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सचिव डॉ. फैजल खान यांनी न्यूज इंटरनॅशनलशी बोलताना अशी माहिती दिली आहे की, 'आम्ही फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर लोकांना लवकरात लवकर व्हॅक्सिनची पहिली बॅच मिळावी याकरता पूर्ण प्रयत्न करत आहोत. मात्र अद्याप अंतिम ऑर्डर देण्यात आली नाही आहे.'
पाकिस्तानकडून चीनच्या सिनफार्मा कंपनीबरोबर व्हॅक्सिनबाबत चर्चा सुरू असल्याचे स्थानिक वृत्तपत्रात सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यावरही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही आहे. डॉ. फैसल खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कॅन्सिनो या दुसऱ्या व्हॅक्सिनवरही ट्रायल सुरू आहे आणि ते त्यांचा डेटा काही आठवड्यात देतील. रशियन व्हॅक्सिन Sputnik V बाबत देखील आमचा विचार सुरू आहे, त्यांनी काही डेटा जमा केला आहे.'
'कोरोना लस दिली आता....' सीरमचे अदार पुनावाला यांच्यासाठी बायकोची WISH पाहा काय
एकंदरित व्हॅक्सिन मिळवण्याच्या शर्यतीत पाकिस्तान खूप मागे आहे. परिणामी सामान्य नागरिक सरकारबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पाकिस्तानात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 5,14,338 आहे तर एकूण 10,863 जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.