इस्लामाबाद, 28 एप्रिल: कोरोना व्हायरस काळात (Coronavirus Pandemic) अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. अशावेळी देखील पाकिस्तानने भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता मदत करण्याचं जाहीर केलं होतं. पाकिस्तान व्हेंटिलेटर्ससह काही आणखी काही आवश्यक गोष्टी भारताला पुरवण्याची तयारी दर्शवली होती. पण पाकिस्तानमध्ये परिस्थिती वेगळी आहे. कोव्हिड काळात धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानची वाटचाल उपासमारीकडे होऊ लागली आहे. इम्रान खान सरकारकडे केवळ तीन आठवडे पुरेल एवढाच गव्हाचा साठा शिल्लक आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तरीन यांनी सोमवारी अशी माहिती दिली आहे की पाकिस्तानला 60 लाख मेट्रिक टन गहू रिझर्व्ह करण्याची आवश्यकता आहे.
एक्सप्रेस ट्रिब्यून नॅशनल प्राइस मॉनिटरिंग कमिटी (NPMC) च्या बैठकीत तरीन यांनी माहिती दिली आहे की गेल्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानकडे केवळ 6,47,687 टन गहू शिल्लक होता. गव्हाचा सध्याचा वापर लक्षात घेता शिल्लक साठा जवळपास अडीच आठवड्यांपर्यंत पुरेल असंही ते म्हणाले. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.
(हे वाचा-पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद; दुकानातल्या वस्तूंवर डल्ला)
एप्रिल अखेरपर्यंत पाकिस्तानात गव्हाचा साठा 3,84,000 मेट्रिक टन होईल, त्यावेळी गव्हाची कापणी सुरू केली जाईल. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गव्हाचा साठा 4 लाख मेट्रिक टनपेक्षाही कमी झाला आहे. तर सिंध प्रांतात हा साठा 57,000 मेट्रिक टन इतकाच शिल्लक आहे. खैबर-पख्तुनख्वामध्ये 58,000 टन आणि PASSCO मध्ये 1,40,000 मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.
एनपीएमसीच्या बैठकीत पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी गव्हाचा साठा वाढवण्यावर भर दिला आहे आणि वेळेवर योग्य पद्धतीनेच गव्हाची खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. योग्य वेळी गव्हाची कापणी आणि सरकारी खरेदी सुरू केल्यास पाकिस्तानला या अडचणीतून मुक्त करता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pak pm Imran Khan, Pakistan