पाकिस्तानी चॅनलचा खोडसाळपणा ; म्हणे,'ओम पुरींचं भूत आलं' !

पाकिस्तानी चॅनलचा खोडसाळपणा ; म्हणे,'ओम पुरींचं भूत आलं' !

  • Share this:

19 एप्रिल : पाकिस्तान सीमेवर कुरापत्या तर करतोच पण आपल्या हद्दीत वाटेल ते बरगळायलाही कमी करत नाही. आता पाकिस्तानी मीडियाने असा जावाई शोध लावला की, ओमपुरींचं भूत आपल्या मारेकऱ्याचा शोध घेत असल्याचा अजब दावा केलाय.

पाकिस्तानी लेहरे टीव्ही न्यूज चॅनलने दावा केला आहे की, ओमपुरी यांची आत्मा त्यांच्या घराभोवती फिरतेय. अँकर आमिर लियाकत यांचं म्हणणंय की, ओमपुरी यांची आत्मा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोसायटीच्या परिसरात फिरतेय. त्यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक व्यक्ती कैद झालीये. ती हुबेहुब ओम पुरी यांच्याशी जुळतेय.

बरं हे एवढ्यावरच थांबले नाही. तर ही व्यक्ती म्हणजे ओम पुरी आहे. आणि ते आपल्या खुन्याचा शोध घेत आहे.

भरातभर म्हणजे या न्यूज चॅनलने भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही या प्रकरणात खेचलंय. ओम पुरींची आत्मा अजित डोवाल, ओम पुरींची पत्नी नदिता यांनाही सोडणार नाही असा दावा हे चॅनल करतंय.

नंदिता पुरी यांनी मात्र या चॅनलच्या अँकरचं डोकं ठिकाणाऱ्यावर नसून तो जोकर आहे असा संताप व्यक्त केला. पाकिस्तानी चॅनलच्या या खोडसाळपणा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. टि्वटरकरांनी या चॅनल आणि अँकरची चांगलीच 'धुलाई' केलीये.

First published: April 19, 2017, 9:42 PM IST

ताज्या बातम्या