Home /News /videsh /

भारताविरोधात पाकिस्तानने पुन्हा रचला मोठा कट; चीनला देणार PoK मधील हे खोरं

भारताविरोधात पाकिस्तानने पुन्हा रचला मोठा कट; चीनला देणार PoK मधील हे खोरं

पाकिस्तान सरकारच्या या योजनेमुळे संतप्त झालेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोकांचा पाकिस्तानी सैन्यासोबतचा संघर्ष गेल्या काही आठवड्यांत लक्षणीय वाढला आहे.

    कराची 12 मे : दहशतवादाला आपला धंदा बनवणारा पाकिस्तान 59 वर्षांनंतर पुन्हा एकदा 'शक्सगाम व्हॅली'सारखाच मोठा कट रचत आहे. कर्ज फेडण्यासाठी पाकने पीओकेचा मोठा भाग चीनला (China-Pakistan) विकण्याची योजना आखली आहे. अहवालानुसार, चीनचं वाढतं कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानमधील हुंजा खोरे चीनला भाड्याने देण्याचा विचार करत आहे. हे खोरं भाडेतत्त्वावर असेल मात्र एकदा का चीनच्या ताब्यात हा भाग गेला की तिथे कायमचा ड्रॅगनचाच ताबा राहील, असं म्हटलं जात आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये (China in Gilgit Baltistan)चीनला मोठ्या प्रमाणावर खनिज उत्खनन करण्याची परवानगी देण्याची तयारीही सुरू आहे. हे अगदी त्याच घटनेप्रमाणे घडत आहे, जेव्हा पाकिस्तानने 1963 मध्ये पीओकेमधील 5 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेली शक्सगाम व्हॅली चीनला भेट दिली होती. ती दरी अजूनही चीनच्या ताब्यात आहे. आता हुंजा खोरे चीनला दिल्यानंतर परिसरातील स्थानिकांकडून निषेध आणि हिंसाचाराची नवी लाट सुरू झाली आहे. पाकिस्तान सरकारच्या या योजनेमुळे संतप्त झालेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोकांचा पाकिस्तानी सैन्यासोबतचा संघर्ष गेल्या काही आठवड्यांत लक्षणीय वाढला आहे. स्कार्डूमध्ये स्थानिक लोकांनी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि त्यांच्या वाहनांवरही दगडफेक केली. पाकिस्तानी सैनिक आपल्या लोकप्रतिनिधींना उघडपणे मारहाणही करत आहेत, याबाबतही लोकांमध्ये संताप आहे. PoK मध्ये चीनने बांधलेला पूल पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला, पाहा थरारक VIDEO गेल्या महिन्याच्या अखेरीस, स्थानिक लोकांचा आवाज उठवल्याबद्दल पाकिस्तानी सैनिकांनी गिलगिट-बाल्टिस्तानचे पर्यटन आणि आरोग्य मंत्री राजा नासिर अली खान यांना क्रूरपणे मारहाण केली. मंत्र्याचा दोष एवढाच होता की त्यांनी स्कर्दू रोड लष्कराच्या ताब्यात देण्यास विरोध केला होता. राजा नसीर अली खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कट्टर समर्थक आहेत. 27 एप्रिल 2022 रोजी घडलेल्या या घटनेने लष्कराच्या विरोधात जनआंदोलन सुरू झालं होतं. या घटनेनंतर संतप्त लोकांनी लष्कराचे अधिकारी आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रसंगी स्थानिक समुदाय लष्कराच्या विरोधात उभा राहिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या नावावर लष्कराच्या 'जमीन बळकावण्याच्या' स्पर्धेमुळे स्थानिक लोक संतापले आहेत. स्थानिक लोकांमध्ये पाकिस्तानी सैन्याविरोधातील निदर्शने तीव्र होताना दिसत आहेत, त्यांची जमीन हिसकावली जात असल्याची भीती व्यक्त होत आहे. रशियाला युक्रेनच्या रणगाड्यापेक्षा छोटूश्या कुत्र्याची भीती? 200 हून अधिक स्फोटकं केली निकामी स्थानिक लोकांचा ठाम विश्वास आहे की CPEC आणि त्याच्या सुरक्षेच्या नावाखाली पाकिस्तानने संपूर्ण गिलगिट बाल्टिस्तान चीनला 50 वर्षांसाठी लीजवर दिला आहे. त्याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी. सीपीईसी प्रकल्पावर काम करण्यासाठी हजारो चिनी लोक आधीच या भागात आहेत. त्यांच्यासह शेकडो चिनी हेर आणि पाकिस्तानी लष्कराचे जवानही या भागात सक्रिय आहेत. स्थानिक लोकांवर लक्ष ठेवण्यासोबतच ते चिनी कंपन्यांनाही सुरक्षा पुरवत आहेत. लोकांचं म्हणणं आहे, की CPEC प्रकल्पाव्यतिरिक्त शेकडो चिनी कंपन्यांनी पाकिस्तानी लष्कराशी संबंधित कंत्राटदारांच्या सहकार्याने या प्रदेशातील जवळजवळ सर्व खाण पट्टे ताब्यात घेतले आहेत. पाकिस्तान सरकारने गिलगिट-बाल्टिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये सोने, युरेनियम आणि मॉलिब्डेनम खाणकामासाठी चिनी कंपन्यांना 2,000 हून अधिक लीज दिले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: China, India vs Pakistan

    पुढील बातम्या