दिल्ली, ता. ११ : पहिल्या शिख पोलीस अधिकाऱ्य़ाची क्रूर थट्टा करणाऱ्या पाकिस्तानचा पुन्हा एकदा क्रूर चेहरा जगासामोर आला आहे. पाकिस्तानचे पहिले शिख पोलीस अधिकारी गुलाब सिंह हे लाहोर येथे राहतात. बुधवारी काही पोलिसांनी त्यांना घरात घुसून जबर मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांची पगडी हिसकावून त्यांना घराबाहेर काढले. यासंदर्भात 'एएनआय'ने जारी केलेल्या व्हिडीओ मध्ये गुलाब सिंह यांनी आपला कशापद्धतीने अपमान करण्यात आला हे स्पष्ट केलंय.
अकोल्यात बँकेत अग्नीतांडव, 8 ते 10 लाख रुपये जळून खाक
VIDEO :गुहागरमध्ये समुद्रातून आलेली महाकाय मगर येत होती वस्तीकडे पण...
पाकिस्तानचे पहिले शिख पोलीस अधिकारी गुलाब सिंह हे 1947 पासून लाहोर येथे वास्तव्यास आहे. त्यांना मारहाणिची घटना जेव्हा घडली, तेव्हा त्यानी मारहाण करणाऱ्या पोलिसांना आपल्या कारर्किदीबाबत माहीतीही देण्याचा प्रयत्न केला. गुलाब सिंह यांनी त्यांच्याकडे 10 मिनीटांचा वेळ देखील मागितला. मात्र, त्यांचे काहीही न एकता पोलिसांनी गुलाब सिंह यांना जबर मारहाण केली. आणि त्यांची पगडी हिसकावून त्यांना घराबाहेर काढले आणि दाराला कुलुप देखील लावून घेतले.
WATCH: #Pakistan’s first #Sikh police officer Gulab Singh was forcibly evicted from his house in Lahore's Dera Chahal, says, 'my faith was disrespected, If they wanted me to evict the house then they could have simply sent me a notice' pic.twitter.com/OWH7Rmjn5z
— ANI (@ANI) July 10, 2018
देखभाल होत नसेल तर 'ताजमहाल' पाडून टाका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं
VIDEO :गुहागरमध्ये समुद्रातून आलेली महाकाय मगर येत होती वस्तीकडे पण...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.