काश्मीरबद्दल तोंडावर पडल्यावर पाकिस्तानला 24 तासांत 2 धक्के, कोट्यवधी रुपये बुडाले

काश्मीरबद्दल तोंडावर पडल्यावर पाकिस्तानला 24 तासांत 2 धक्के, कोट्यवधी रुपये बुडाले

काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पराभव आणि भारताशी वाढता संघर्ष पाहून गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातले पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी शेअर बाजार चांगलाच गडगडला आणि कोट्यवधी रुपये बुडाले. त्याशिवाय अमेरिकेनेही पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत कमी करण्याचा इशारा दिला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 17 ऑगस्ट : काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे. काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला पाकिस्तानने जोरदार विरोध केला. हा निर्णय बदलण्यात यावा यासाठी पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही उपस्थित केला. पण पाकिस्तानच्या या प्रस्तावाला चीन सोडून इतर कोणत्याच देशाचा पाठिंबा मिळाला नाही.

काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पराभव आणि भारताशी वाढता संघर्ष पाहून गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातले पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी शेअर बाजार चांगलाच गडगडला आणि कोट्यवधी रुपये बुडाले. त्याशिवाय अमेरिकेनेही पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत कमी करण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या मदतीत कपात

अमेरिकेकडून पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीत 44 कोटी डॉलर्सची कपात केली जाणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला फक्त 4. 1 अरब डॉलर्सची रक्कम दिली जाईल.

एक्सप्रेस ट्रिब्यून या पाकिस्तानातल्या एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, या कपातीबद्दल अमेरिकेने पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्याआधीच इशारा दिला होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कारकिर्दीला 28 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या कार्यकाळातच पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. इथल्या महागाईचा दरही 11 टक्क्यांवर गेला आहे.

अंडरवेअर्सच्या विक्रीत घट, डेटिंग वाढलं, हे आहे आर्थिक मंदीचं कनेक्शन!

एकीकडे महागाई आणि दुसरीकडे वाढती बेरोजगारी असं दुहेरी संकट पाकिस्तानवर आलं आहे. यावर्षी या देशात आणखी दहा लाख लोक बेरोजगार होतील, असा अंदाज आहे. त्याबरोबरच दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या लोकांचा आकडा 40 लाखांनी वाढणार आहे.

पाकिस्तानी रुपया कमकुवत झाल्यामुळे इथे महागाई वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत 160 रु. 87 पैसे एवढी झाली आहे.

==================================================================================

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

First published: August 17, 2019, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading