Home /News /videsh /

पाक मंत्र्याचा कहर: नुसत्या ठेवून खराब होऊ नयेत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांवर फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

पाक मंत्र्याचा कहर: नुसत्या ठेवून खराब होऊ नयेत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांवर फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

पाकिस्तानमध्ये पगारवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या (tear gas shells) फोडल्या होत्या.

रावळपिंड (पाकिस्तान) ,15 फेब्रुवारी :  आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद अहमद (Sheikh Ahmed Rashid) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशामध्ये पगारवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या (tear gas shells) फोडल्या होत्या. त्याबाबत शेख राशिद अहमद यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी असं सांगितलं की, 'गेल्या काही दिवसांपासून अश्रूधुराच्या नळकांड्या तशाच पडून होत्या. त्यामुळे त्यांचं टेस्टिंग करणं आवश्यक होत.' रावळपिंडीतील एका कार्यक्रमात शेख राशिद अहमद यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'इस्लामाबाद पोलिसांनी काही अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर केला. ते करणं गरजेचं होतं कारण अश्रूधुराच्या नळकांड्या बऱ्याच काळापासून अशाच पडून होत्या आणि त्याचा वापर केला गेला नव्हता.' त्यांनी हा देखील दावा केला आहे की, 'थोड्याशा प्रमाणातच अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर केला गेला.' शेख राशिद अहमद यांनी पुढे असे सुद्धा सांगितलं की, 'खरी समस्या अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणं ही नाही तर वेतनवाढ करणं ही आहे. यामुळे महागाईच्या काळात सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचं ओझं वाढेल.' दरम्यान, पाकिस्तानी पोलिसांनी 10 फेब्रुवारीला वेतन आणि पेन्शन वाढीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. हे वाचा - पाकची कोंडी केल्यामुळे शस्त्रास्त्रांसाठी दहशतवाद्यांचा मोर्चा बिहारकडे यासंदर्भात, पाकिस्तानचे मंत्री शेख राशिद अहमद यांच्या या धक्कादायक वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी जनतेने केली आहे. पाकिस्तानच्या समा टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, 'जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. पाकिस्तानातील संसद भवनाच्या दिशेने हे आंदोलक जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.'
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Pakistan, Politics

पुढील बातम्या