नवी दिल्ली, 16 जानेवारी: दिवसेंदिवस पाकिस्तानची जागतिक स्तरावर बदनामी होईल, अशा घटना समोर येत आहे. शुक्रवारी देखील असेच एक वृत्त समोर आले आहे. कर्ज फेडण्यात अयशस्वी ठरल्याने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन (Pakistan International Airline) ला मोठा फटका सहन करावा लागला आहे. मलेशियाने PIA चे एक पॅसेंजर विमान जप्त केले आहे. मीडिया अहवालांच्या मते बोइंग 777 प्रवासी विमान लीजवर घेण्यात आले होते, त्याचे पैसे न दिल्याने पाकिस्तानने विमान जप्त करण्याचा अधिकार मलेशियाने घेतला आहे. क्वालालांपूर याठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यावेळी विमानामध्ये प्रवासी आणि केबिन क्रू होता, त्यांना देखील खाली उतरवण्यात आले. त्यानंतर जप्तीची कारवाई करण्यात आली.
दरम्यान PIA ने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती. पीआयएने मलेशियन कोर्टावर टीका करणारं ट्वीट केलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'पीआयएचं विमान मलेशियाच्या स्थानिक कोर्टाने जप्त केले पकडले असून त्यांनी यूके कोर्टात सुरू असणाऱ्या पीआयए आणि एका पक्षाच्या प्रलंबित कायदेशीर वादासंबंधी एकतर्फी निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रवाशांची काळजी घेण्यात येत असून त्यांच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.'
A PIA aircraft has been held back by a local court in Malaysia taking one sided decision pertaining to a legal dispute between PIA and another party pending in a UK court.
The passengers are being looked after and alternate arrangements for their travel have been finalized. — PIA (@Official_PIA) January 15, 2021
पीआयए ने पाकिस्तान सरकारबाबत भाष्य करताना आणखी एक भाष्य केले आहे की, 'ही एक न स्वीकारता येणारी परिस्थिती आहे आणि पीआयएने पाकिस्तान सरकारकडे मुत्सद्दी माध्यमांद्वारे हे प्रकरण उपस्थित करण्यासाठी मदत मागितली आहे.
It is an unacceptable situation and PIA has engaged the support from Government of Pakistan to take up this matter using diplomatic channels
— PIA (@Official_PIA) January 15, 2021
पाकिस्तानातील वृत्तपत्रांच्या मते पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या ताफ्यात एकूण 12 बोइंग 777 विमान आहेत. या विमानांना वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या वेळी ड्राय लीजवर घेण्यात आले आहे. मलेशियात जप्त झालेले विमान देखील अशाप्रकारे लीजवर घेण्यात आले होते. मात्र या डीलमध्ये असे देखील होते की, पैसे चुकवण्यास PIA असमर्थ ठरल्यास विमान जप्त केले जाईल. क्वालालांपूर मध्ये याच आधारावर PIA चं विमान जप्त करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan