मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जगाला पुन्हा दिसली पाकिस्तान-तालिबान मैत्री, नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वी ISI प्रमुख काबूलमध्ये दाखल

जगाला पुन्हा दिसली पाकिस्तान-तालिबान मैत्री, नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वी ISI प्रमुख काबूलमध्ये दाखल

तालिबानशी  (Taliban) असलेल्या संबंधांचा पाकिस्तानकडून (Pakistan) वारंवार इन्कार केला जातो. मात्र या दोघांचे संबंध किती मजबूत आहेत, आणि त्यांची परस्परांशी किती घट्ट मैत्री आहे हे सिद्ध करणारं उदाहरण जगासमोर आले आहे.

  • Published by:  News18 Desk

काबूल, 4 सप्टेंबर :  तालिबानशी  (Taliban) असलेल्या संबंधांचा पाकिस्तानकडून (Pakistan) वारंवार इन्कार केला जातो. मात्र या दोघांचे संबंध किती मजबूत आहेत, आणि त्यांची परस्परांशी किती घट्ट मैत्री आहे हे सिद्ध करणारं उदाहरण जगासमोर आले आहे.  पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI चे प्रमुख फैज अहमद (Lt Gen Faiz Hameed) काबूलमध्ये दाखल झाले आहेत. काबूलमध्ये तालिबान नवं सरकार स्थापन करण्याच्या अंतिम टप्प्याच असताना अहमद एका खास शिष्टमंडळासह काबूलमध्ये दाखल झाले आहेत.

तालिबानचे नेतृत्त्व आणि आयएसआय प्रमुख यांच्या भेटीची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या नव्या सरकारचे प्रमुख समजले जाणारे मुल्ला अब्दूल गनी बरादर (Mullah Abdul Ghani Baradar) सोबतही त्यांचा फोटो प्रसिद्ध झाला होता.

अफगाणिस्तानात तालिबानच्या सरकारची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्या परिस्थितीमध्ये काबूलमध्ये आयएसआय प्रमुखांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व आहे. काबूलमध्ये राजदूताची भेट घेण्यासाठी ते दाखल झाल्याचा दावा पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनीही यापूर्वी अप्रत्यक्षपणे तालिबानच्या वाढलेल्या प्रभावाचे समर्थन केले आहे.

इम्रान सरकारमधील मंत्री शेख राशीद यांनी तर पाकिस्तान हे तालिबानचे 'संरक्षक' असल्याचं सार्वजनिकपणे मान्य केले होते. एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी सांगितले होते की, 'आम्ही तालिबानी नेत्यांचे संरक्षक आहोत. आम्ही दीर्घ काळापासून त्यांची काळजी घेतली आहे. पाकिस्तानात त्यांना आश्रय, शिक्षण आणि घर मिळाले. आम्ही त्यांच्यासाठी सर्व काही केले आहे.' असे वक्तव्य केले होते.

आज नव्या तालिबानी सरकारची होणार स्थापना; कोणाला मिळणार मंत्रीपद?, कोण करणार सरकारचं नेतृत्त्व?, वाचा सविस्तर

भारत-अमेरिकेची नजर

भारत आणि तालिबानमधील संपर्क सध्या मर्यादीत असल्याची प्रतिक्रिया विदेश सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये वेगानं बदलत असलेल्या परिस्थितीवर अमेरिकेचेही लक्ष आहे. अमेरिकेनं या विषयावर भारतालाही सतर्क राहण्याची सूचना केली आहे.

First published:

Tags: Afghanistan, Pakistan, Taliban