इम्रान खानचे भारतात 5 मुलं, समलैंगिक संबंधही ठेवले; पहिल्या पत्नीचा आरोप

रेहम खानने आपल्या पुस्तकात इम्रान खानवर धक्कादायक आरोप केलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2018 07:39 PM IST

इम्रान खानचे भारतात 5 मुलं, समलैंगिक संबंधही ठेवले; पहिल्या पत्नीचा आरोप

पाकिस्तान, 12 जुलै : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे सर्वेसर्वा इम्रान खानची पहिल्या पत्नीने खळबळजनक आरोप केल्यामुळे इम्रान अडचणीत सापडलाय. पत्नी रेहम खानने आपल्या पुस्तकात इम्रानचे भारतात पाच मुलं आहे आणि तो एका पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला असा खळबळजनक आरोप केलाय.

रेहम खानने आपल्या पुस्तकात इम्रान खानवर धक्कादायक आरोप केलाय. इम्रान खानचे आपल्याच पक्षातील महिलांसोबत शारीरिक संबंध आहे. रेहमने असाही दावा केलाय की, इम्रान खान एका पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. त्यांचे हे संबंध बरेच काळ सुरू होते. एवढंच नाहीतर इम्रान खान हा ड्रग्स घेतो आणि जगभरात त्याचे अनेक मुलं आहे. इम्रानचे भारतात पाच मुलं आहे असा दावाही रेहम याने केला.

जादूटोण्याबद्दलही रेहमने धक्कादायक खुलासा केलाय. इम्रान खानच्या पक्षातील एका नेत्याने शापातून मुक्त होण्यासाठी आपल्या नग्न शरीरावर काळी मसूर डाळ रगडत होता हे मी पाहिलं असंही रेहमने पुस्तकात लिहिलंय.

VIDEO...तर हवेतच झाली असती विमानांची टक्कर, बंगळुरूच्या आकाशातला थरार!

इम्रान खान हा ड्रग्सच्या आहारी गेला होता. त्याला एकदा बाथरूममध्ये ड्रग्स घेताना रंगेहाथ पकडलं होतं. इम्रान हेराईनही घेत होता आणि त्याच्याकडे बेंजोडाइजेपीन सारखे बंदी घातलेली औषधीही होती असा दावाही त्याने केला.

Loading...

रेहमने इम्रान खान यांच्यावर समलैंगिक संबंधाचाही आरोप केलाय. इम्रानचा जवळचा मित्राच्या नावाचा उल्लेख करून दोघेही लिव इनमध्ये राहिले होते असा दावाही तिने केला.

आव्हाडांचं 'नाचता येईना...'अन् भगवत गीतेचा श्लोकही म्हणता येईना !

विशेष बाब म्हणजे, मागिल महिन्यात सीएनएन न्यूज18 सोबत रेहमने बातचीत केली तेव्हा इम्रान खानवर अनेक आरोप केले होते.इम्रानचा खरा चेहरा माझ्या पुस्तकातून जगासमोर येईल, त्यावरुन पाकिस्तानच्या जनतेनं मतदान करावं की नाही याचा निर्णय घ्यावा असं रेहम म्हणाली होती.

ट्विटर फॉलोअर्सच्या 'टॉप टेन' यादीत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी

इम्रान राजकीय फायद्यासाठी सैन्याला आतापासूनच तयार कर आहे. इथं विरोधकांनीच नाहीतर भारत सरकारलाही अलर्ट राहावे लागेल असंही रेहमने सांगितलं होतं.

पाकिस्तानमध्ये 25 जुलैला निवडणूक होत आहे. पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान होण्याचं इम्रान खान यांचं स्वप्न आहे. पण आता त्याच्या पहिल्या पत्नीने केलेल्या आरोपामुळे अडचणीत वाढ झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...