Home /News /videsh /

26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला इम्रान खान सरकार दरमहा देणार 'पॉकेटमनी'!

26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला इम्रान खान सरकार दरमहा देणार 'पॉकेटमनी'!

भारतावर दहशतवादी हल्ला (Terrorist attack) करणाऱ्या संघटनांना पाकिस्तानमधील इम्रान खान (Imran Khan) सरकार आता उघडपणे पाठिंबा देत आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीशी (Zakiur Rehman Lakhvi) संबंधित एक प्रकरण नुकतंच उघड झालं आहे.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 11 डिसेंबर:  भारतावर दहशतवादी हल्ला (Terrorist attack) करणाऱ्या संघटनांना पाकिस्तानमधील इम्रान खान (Imran Khan) सरकार आता उघडपणे पाठिंबा देत आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीशी (Zakiur Rehman Lakhvi) संबंधित एक प्रकरण नुकतंच उघड झालं आहे. पाकिस्तान सरकार भोजन, औषधं आणि वकिलाच्या खर्चासाठी लख्वीला दरमहा भक्कम रक्कम देणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) समितीची देखील परवानगी घेतली आहे. लख्वीला मिळणार भक्कम मदत पाकिस्तान सरकार लख्वीला दरमहा भोजन खर्चासाठी 50 हजार, औषधांसाठी 45 हजार, सार्वजनिक खर्चासाठी 20 हजार आणि प्रवासासाठी 15 हजार रुपये देणार आहे. लख्वीवर वेगवेगळे खटले सुरु आहेत. या खटल्यातील वकिलांचा खर्चही सरकारी तिजोरीतून होणार आहे. वकिलांची फिस देण्यासाठी लख्वीला दरमहा 20 हजार रुपये मिळतील. आर्थिक मदतीसाठी वेगवेगळ्या देशांच्या दारात याचिका करणारं इम्रान खान सरकार लख्वीला दर महिन्याला एकूण दीड लाख रुपये देणार आहे. संयुक्त राष्ट्राची मान्यता पाकिस्तान सरकारने लख्वीला अधिकृतपणे पैसे देता यावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडं विनंती केली होती. ही विनंती सुरक्षा परिषदेनं मान्य केलीय. विशेष म्हणजे मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर लख्वीला संयुक्त राष्ट्रानं दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. (हे वाचा-शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर..., संजय राऊतांनी दिला काँग्रेसला सल्ला) त्यानंतर तो काही काळ रावळपिंडीच्या जेलमध्ये होता. लख्वीची अटक म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचं तेंव्हा स्पष्ट झालं होतं. राळपिंडीच्या जेलमध्ये असतानाच त्याला एक मुलगा देखील झाला. लख्वीला 2015 साली जामीन मिळाला असून तेंव्हापासून तो बाहेर आहे. लादेनच्या मित्राला मिळणार मदत पाकिस्तान सरकारनं लख्वीप्रमाणेच आणखी एक खतरनाक अतिरेकी महमूद सुलतान बशीरुद्दीनला मासिक खर्च देण्यासाठी संयुक्त राष्ट्राची परवानगी मिळवली आहे. महमूद हा  पाकिस्तानचा अणू शास्त्रज्ञ होता. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनची भेट घेतली. महमूदनं तामीर-ए-नाऊ ही दहशतवादी संघटना स्थापन केली असून त्या संघटनेवर संयुक्त राष्ट्रानं बंदी घातली आहे. पाकिस्तान सरकार त्यालाही लख्वीप्रमाणे दरमहा दीड लाख रुपयांची मदत करणार आहे. (हे वाचा-माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका...' पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला) पाकिस्तान सरकारच्या आश्रयात राहत असलेला आणखी एक मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदला बँक खात्यामधील पैसा वापरण्यास संयुक्त राष्ट्राने 2019 साली परवानगी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या