Home /News /videsh /

पाक करतंय लोकांच्या जीवाशी खेळ, कोरोनाच्या उद्रेकात आरोग्यावर फक्त 0.2% खर्च

पाक करतंय लोकांच्या जीवाशी खेळ, कोरोनाच्या उद्रेकात आरोग्यावर फक्त 0.2% खर्च

पाकिस्ताननं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सरकारने आरोग्य व्यवस्थेवर केवळ 0.2 टक्के खर्च केल्याचे समोर आले आहे.

    इस्लामाबाद, 07 एप्रिल : पाकिस्तान सध्या आतापर्यंतच्या सर्वात गंभीर संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सरकारनं आरोग्य व्यवस्थेवर केवळ 0.2 टक्के खर्च केल्याचे समोर आलं आहे. 'समा टीव्ही'च्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या नऊ महिन्यांत या केंद्राचा महसूल 4273 अब्ज रुपये होता, त्यापैकी केवळ 7.6 अब्ज आरोग्यावर खर्च झाले आहे. यात कोरोना विषाणूसह इतर संबंधित खर्चांचाही समावेश आहे. अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार या नऊ महिन्यांत सुमारे दोन तृतीयांश महसूल म्हणजेच 62 टक्के संरक्षण व संरक्षणावरील व्याज देयकावर खर्च झाला आहे. कर्जावरील व्याज पेमेंट म्हणून 1879 अब्ज तर सुरक्षेवर 802 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारला 1 हजार 686 अब्ज रुपयांच्या अर्थसंकल्पातील तूट सहन करावी लागली. याचा अर्थ असा होतो की सरकारचा खर्च त्याच्या महसुलापेक्षा जास्त आहे. वाचा-दापोलीतील खळबळजनक घटना, एका चुकीमुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बसला हादरा! आरोग्याआधी कर्ज फेडण्यावर पाकचा भर माध्यमांच्या वृत्तानुसार, महसूल घटल्यामुळे तीन महिन्यांत पाकिस्तानचा अर्थसंकल्प जीडीपीच्या 3.8 टक्के इतका झाला आहे. कर वसुली आणि सरकारी महसूल वाढविण्यात पाकिस्तानमधील सरकारे अपयशी ठरले आहे. यामुळे दरवर्षी अर्थसंकल्पातील तूट वाढत आहे. एकीकडे सरकार महसूल वाढविण्यात अपयशी ठरत आहे, तर दुसरीकडे त्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे पाकिस्तान अशा कर्जाच्या दलदलीत अडकला आहे, त्यामुळं त्यांना न्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. या अहवालानुसार या नऊ महिन्यांत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील विकास कार्यक्रमात केवळ 722 अब्ज रुपये खर्च केले आहेत, जे सर्व खर्चाच्या 11 टक्के आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. वाचा-कोरोनाचा टाइम बॉम्ब निघाली 'ही' विमान कंपनी, पॉझिटिव्ह रुग्णांना घेऊन प्रवास
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या