इस्लामाबाद 24 मार्च : आर्थिक मंदीने ग्रासलेला पाकिस्तान कोरोनामुळे आणखी गाळात सापडलाय. पाकिस्तानातल्या अनेक प्रांतांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या 900वर गेली असून मृत्यूचा आकडाही वाढत आहे. पाकिस्तानातल्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा नाहीत अशी टीका सातत्याने होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरचे नेते नासिर अजिज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केलाय. या आरोपांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानातल्या सर्व 900 कोरोना बाधित रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमधल्या मीरपूर इथं एका कॅम्पमध्ये ठेवण्यात येणार असल्याचा आरोप अजिज यांनी केला आहे. पीओकेमध्ये उत्तम हॉस्पिटल्स नाहीत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सही नाहीत त्यामुळे पाकिस्तान केवळ इथल्या लोकांना या आजाराची लागण होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचाही आरोप केलाय.
पाकिस्तान(Pakistan) मधील गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan)मध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी कोरोनाबाधित वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका तरुण डॉक्टराचा मृत्यू झाला आहे.
'फक्त डिफेंड नाही, अटॅक करा', या खेळाच्या रणनीतीप्रमाणे कोरोनाशी लढा - WHO
त्याच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी यासाठी सरकारला दोषी ठरवलं आहे. सरकारने जर योग्य मास्क आणि इतर साधनं दिली असती तर त्याचा जीव वाचला असता.
गिलगिट-बाल्टिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री शम्स मीर यांनी सांगितलं की, '26 वर्षीय डॉक्टर ओसामा रियाज (Usama Riaz) यांचा कोरोना व्हायरसची बाधा झाल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.'
Corona चा पहिला रुग्ण सापडला, ज्याच्यामुळे संपूर्ण देश व्हायरसच्या विळख्यात आला
मीर यांनी पुढे सांगितलं की, 'डॉक्टर ओसामा यांनी दुसऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी आपल्या जिवाचं बलिदान दिलं. त्यांना राष्ट्रीय हीरो घोषित करण्यात येत आहे. ओसामा यांची इराण आणि इराकमधून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती.'