मेरे लिए दुआ करें...' असं का म्हणाले पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी

मेरे लिए दुआ करें...' असं का म्हणाले पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी

पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यासोबत नेमकं काय घडलं.

  • Share this:

इस्लामाबाद, 04 जुलै : जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान पोहोचलं आहे. सामान्य नागरिकांपासून ते नेत्यांपर्यंत आणि आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांपासून ते देशविदेशातील मंत्र्यांपर्यंत अनेक नेत्यांच्या घरात कोरोनानं शिरकाव गेल्या काही दिवसांत केला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शुक्रवारी कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर कुरेशी यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

पाकिस्तानचे विदेशमंत्री कुरेशी यांना हळू हळू ताप येऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं. 'माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं मी घरातून आपलं काम करत आहे. पण मी बरं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करा.' असं कुरेशी यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

पाकिस्तानात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,21,896 वर पोहोचला आहे. 1,13,623 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर 1,08,273 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचा-VIDEO: माज उतरवला! चिनी सैन्याच्या खतरनाक स्टंटला असं दिलं भारतीयांनी उत्तर

कोरोनामुळे मागच्या 24 तासांत 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2,479 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर 24 तासांत 22,941 हजार लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. पाकिस्तानमध्ये अर्ध्याहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. विदेश मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्यानं खळबळ उडाली आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 4, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या