मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लॉकडाऊनचा पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना फटका, मुलींच्या धर्मांतरामध्ये मोठी वाढ!

लॉकडाऊनचा पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना फटका, मुलींच्या धर्मांतरामध्ये मोठी वाढ!

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार दरवर्षी 1 हजार अल्पसंख्याक मुलींना (Girl From Minority Section ) जबरदस्तीनं इस्लाम कबूल करण्यास भाग पाडलं जातं अशी माहिती उघड झाली आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार दरवर्षी 1 हजार अल्पसंख्याक मुलींना (Girl From Minority Section ) जबरदस्तीनं इस्लाम कबूल करण्यास भाग पाडलं जातं अशी माहिती उघड झाली आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार दरवर्षी 1 हजार अल्पसंख्याक मुलींना (Girl From Minority Section ) जबरदस्तीनं इस्लाम कबूल करण्यास भाग पाडलं जातं अशी माहिती उघड झाली आहे.

  • Published by:  News18 Desk
इस्लामाबाद, 30 डिसेंबर :  पाकिस्तानमध्ये (Pakistan) अल्पसंख्याक (Minority) नागरिकांवर होणारे अन्याय काही नवे नाहीत. अल्पसंख्याक मुलींचं अपहरण करुन त्यांना जबदरस्तीनं इस्लाम करण्याची प्रकरण गेल्या काही वर्षांमध्ये उघडकीस आले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार दरवर्षी 1 हजार अल्पसंख्याक मुलींना (Girl From Minority Section ) जबरदस्तीनं इस्लाम कबूल करण्यास भाग पाडलं जातं अशी माहिती उघड झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) पाकिस्तानात यावर्षी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले होते. या काळात या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असा दावा मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. लॉकडाऊनमध्ये का वाढले धर्मांतर? लॉकडाऊननुळे मुलींची शाळा बंद आहे. यामधील अनेक मुलींचे पालक कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. त्यामुळे या कुटुंबांना टार्गेट करण्यासाठी मुलींची तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. मुलींचा शोध घेण्यासाठी इंटरनेटचाही वापर या टोळींकडून केला जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या महिन्यात ‘धार्मिक स्वातंत्र्याची समस्या निर्माण झालेला देश’ अशी पाकिस्तानची घोषणा केली होती. पाकिस्तानमधील सत्तारुढ इम्रान खान सरकारनं (Imran Khan Government)  अमेरिकेचा दावा तातडीनं फेटाळला होता. कोणत्या धर्मातील मुलींना फटका? अमेरिकन आयोगानं आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य या विषयाच्या अंतर्गत पाकिस्तानच्या परिस्थितीचा अभ्यास केला. यामध्ये हिंदू, शिख आणि ख्रिश्चन या देशातील अल्पसंख्याक समाजातील अल्पवयीन मुलींना विशेष टार्गेट करण्यात येत असल्याचं उघड झालं आहे. या मुलींनी इस्लाम धर्माचा स्विकार करावा म्हणून त्यांचे अपहरण करणे, जबरदस्तीनं लग्न लावणे आणि लग्नानंतर त्यांच्यावर बलात्कार करणे या सारखे प्रकार पाकिस्तानमध्ये घड़ले आहेत. सिंध प्रांतामधील गरिब घरातल्या हिंदू मुली धर्मांतराच्या प्रकाराला मोठ्या प्रमाणात बळी पडल्या आहेत. जवळच्या नातेवाईंकांचा सहभाग या मुलींचे अपहरणासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक किंवा ओळखीच्या मंडळींच्या सामान्यपणे वापर केला जातो. अनेकदा त्यांच्या आई – वडिलांवर त्यांचं कर्ज चुकवण्यासाठीही मुलींना श्रीमंत जमिनदाराकडं सोपवण्याची वेळ येते. या प्रकरणात पोलीस गांभीर्यानं लक्ष देत नाहीत. मौलवी, भ्रष्ट पोलीस आणि न्याय यंत्रणा यांची आरोपींना मदत होते, असा आरोप करण्यात येत आहे. या मुलींचं वयस्कर पुरुषांसोबत किंवा त्यांचं अपहरण करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न लावण्यात येतं असा दावा पाकिस्तानच्या स्वतंत्र मानवाधिकार आयोगानं केला आहे.
First published:

Tags: Pakistan

पुढील बातम्या