Home /News /videsh /

पाकिस्तान दहशतवादाला घालतय खतपाणी? ग्रे यादीनंतर ब्लॅकलिस्ट होण्याची शक्यता

पाकिस्तान दहशतवादाला घालतय खतपाणी? ग्रे यादीनंतर ब्लॅकलिस्ट होण्याची शक्यता

जर एखादा देश ब्लॅकलिस्टमध्ये गेला तर त्याला जगभरातून मिळणाऱ्या निधींवर मोठा परिणाम होतो.

    नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर :  कर्जाच्या संकटात होरपळणाऱ्या पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या संघटनांवर देखरेख ठेवणाऱ्या 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) या संस्थेच्या एशिया पॅसिफिक गटाने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं आहे. त्यानंतर आता पाकिस्तान ब्लॅकलिस्टमध्येदेखील टाकला जाण्याची शक्यता आहे. येत्या 21 आणि 23 ऑकटोबरला या संघटनेची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये  ठेवायचं की काढायच यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला या यादीतून बाहेर येण्याची इच्छा आहे. पण इतर देशांवर देखील बरेच काही अवलंबून आहे. FATF या संस्थेचं कार्य दहशतवादाला आर्थिक पुरवठ्यावर नजर ठेवण्याचं आहे. स्थापना करताना एफएटीएफचे 16 सदस्य देश होते, तर 2016 मध्ये ही संख्या 37 झाली आहे. भारतासह जगातील जवळपास सर्व मोठ्या देशांचा यामध्ये समावेश आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर कारवाई करून त्यांना ब्लॅक किंवा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचं काम ही संस्था करते. जर एखादा देश ब्लॅकलिस्टमध्ये गेला तर त्याला जगभरातून मिळणाऱ्या निधींवर मोठा परिणाम होतो. पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये जाणं परवडणारं नाही. पाकिस्तानने देखील या लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेतील सर्वात मोठ्या  असोसिएशन फर्मला हायर केलं आहे. हे ही वाचा-मुलीला आधी विष पाजले नंतर अत्याचार, अमरावती जिल्ह्यातली संतापजनक घटना या फर्मच्या मदतीने ते या लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु या लिस्टमधून बाहेर पडणं सोपं काम नाही. यासाठी पाकिस्तानला या संस्थेतल्या 12 देशांचा पाठिंबा गरजेचा आहे. या सगळ्यात अमेरिकेची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. सध्या पाकिस्तानकडे केवळ 3 देशांचा पाठिंबा आहे. या तीन देशांमध्ये चीन, तुर्की आणि मलेशियाचा समावेश आहे. त्यामुळे सध्या या लिस्टमधून पाकिस्तान बाहेर पडणं अवघड आहे. पाकिस्तानने अमेरिकेतील Linden Strategies फर्मला हायर केलं असून ट्रम्प प्रशासनाला खुश करून अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. या लिस्टमधून बाहेर पाडण्यासाठी पाकिस्तानला या संस्थेने घालून दिलेल्या 27 पॉइंटचे पालन करावे लागणार आहे. पाकिस्तान यासाठी प्रयत्न देखील करताना दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली होती. यामध्ये जमात उद दावाचा हाफिज सईद, जैश ए मोहम्मदाचा प्रमुख मसूद अजहर आणि दाऊद इब्राहिम सारख्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला या कारवाईमुळे किती दिलासा मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मागील काही काळापासून पाकिस्तान चीनच्या अधिक जवळ गेल्याने अमेरिका नाराज झाला आहे. त्यामुळे येत्या बैठकीत अमेरिका पाकिस्तानला पाठिंबा देणार की कडक भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या