पाकिस्तानला अजूनही वाटते Air Strikeची भीती; भारताला केली ही विनंती! Air Strike, Pakistan, Air Space, imran khan, Narendra Modi

पाकिस्तानला अजूनही वाटते Air Strikeची भीती; भारताला केली ही विनंती! Air Strike, Pakistan, Air Space, imran khan, Narendra Modi

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान अद्याप सावरलेला दिसत नाही.

  • Share this:

इस्लामाबाद, 22 जून: भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईक(Air Strike)नंतर पाकिस्तान (Pakistan) अद्याप सावरलेला दिसत नाही. पाकिस्तानमधील इमरान खान सरकारने अद्याप भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र खुले केले नाही. त्यामुळे भारतात येणारी किंवा भारतातून जाणाऱ्या विमानांना अधिक लांबचा प्रवास करून जावे लागते. हवाई क्षेत्र खुले करण्यासंदर्भात आता पाकिस्तानने भारतापुढे विनंती वजा अट ठेवली आहे. ही अट मान्य केली तरच आम्ही तुम्हाला हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी देऊ असे पाकिस्तानने म्हटले आहे.

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. या स्ट्राईकनंतर पाकिस्तानने त्यांचे पूर्व भागातील हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केले होते. आता इमरान खान सरकारने भारताला हवाई क्षेत्र खुले करण्याची तयारी दाखवली आहे. पण त्याबदल्यात त्यांना भारताकडून एक आश्वासन हवं आहे. जर भारत पुन्हा एअर स्ट्राईक करणार नाही याची हमी देत असेल तर हवाई क्षेत्र खुले करण्यात येईल.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने हवाई क्षेत्र वापरण्यावर 28 जूनपर्यंत बंदी घातली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान तोपर्यंत हवाई क्षेत्र भारतासाठी खुले करणार नाही जोपर्यंत भारत एअर स्ट्राईक न करण्याचे आश्वासन देत नाही. पाकिस्तानने 26 फेब्रुवारी रोजी ही बंदी घातली होती. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40हून अधिक जवाना शहिद झाले होते. त्यानंतर भारताने 12 दिवसांनी एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात अनेक दहशतवादी तल नष्ट करण्यात आले होते. तेव्हापासून पाकने हवाई क्षेत्र वापरण्यावर बंदी घातली होती.

भारताने पाडले होते F-16 विमान

भारताने केलेल्या या कारवाईनंतर 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारतीय हवाई दलाने त्यांचे F-16 विमान पाडले होते. भारतासाठी पाकिस्तानची हवाई क्षेत्र महत्त्वाचे ठरते. या मार्गावरून रोज अनेक प्रवासी आणि मालवाहूक करणारी विमाने प्रवास करतात. पाकने हा मार्ग बंद केल्यामुळे विमान कंपन्यांना अधिक इंधनाचा खर्च करावा लागत आहे. तर प्रवाशांना अधिक वेळ प्रवास करावा लागत आहे.

सिडकोच्या 90 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First Published: Jun 22, 2019 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading