• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भारताशी पंगा पाकला पडला महागात, 'या' निर्णयामुळं इमरान खान सरकार पडणार तोंडघशी

भारताशी पंगा पाकला पडला महागात, 'या' निर्णयामुळं इमरान खान सरकार पडणार तोंडघशी

उपासमारी आणि गरिबीमुळं पाक पुर्णत: डबघाईला गेला आहे. यात भारताशी वैमनस्य घेणं पाकिस्तानला महागात पडणार असल्याचे दिसत आहे.

 • Share this:
  इस्लामाबाद, 15 मे : पाकिस्तानमध्ये कोरोनामुळं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. उपासमारी आणि गरिबीमुळं पाक पुर्णत: डबघाईला गेला आहे. यात भारताशी वैमनस्य घेणं पाकिस्तानला महागात पडणार असल्याचं दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात जेव्हा मोदी सरकारनं काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला तेव्हा पाकिस्ताननं भारताशी पूर्णपणे व्यापार बंदी करण्याचं आत्मघाती पाउल उचललं. आता पाकिस्तानातील औषध कंपन्यांनी इमरान खान सरकारच्या  आयातीवर बंदी निर्णयावर टीका केली आहे. भारतातून अमली औषधांच्या आयातीवरून गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताकडून व्यापारावर पूर्ण बंदी आणल्यानंतर केवळ काही दिवसांनी पाकिस्तानने जीवनरक्षक औषधांच्या आयातीला सूट दिली. जीवनरक्षकांच्या नावाखाली, जीवनसत्त्वे आणि मोहरीचे तेलही भारतातून मिळू लागलं. ही बाब जेव्हा उघडकीस आली तेव्हा पाकिस्तान सरकारला चपखल बसला. हा वाद जसजसा वाढत गेला तसतशी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तान सरकारनं दिले. आता पाकिस्तान सरकारच्या संभाव्य कारवाईवरून फार्मा उद्योगात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाचा-बंद पडलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पाकिस्तानच्या फार्मा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने भारतातून येणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घालण्यासाठी पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. असोसिएशनने असे म्हटले आहे की असे झाल्यास औषधांच्या उत्पादनात 50 टक्के तोटा होईल. यामुळे केवळ पाकिस्तानात औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही तर कोरोना विषाणूंविरूद्ध देशातील लढादेखील कमकुवत होईल. वाचा-Monsoon 2020 आगमन 4 दिवस लांबणीवर, 'या' तारखेला केरळमध्ये दाखल होणार पीपीएमएचे माजी अध्यक्ष डॉ. केसर वाहिद यांनीही सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये औषधाचे 95 टक्के उत्पादन इतर देशांकडून आणल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असते. त्यापैकी भारताचा वाटा 50 टक्के आहे, तर उर्वरित भाग चीन आणि काही युरोपियन देशांतून आयात केला जातो. भारतातून फारच थोड्या प्रमाणात रेडीमेड औषधे येतात ज्यात लस इत्यादींचा समावेश आहे. डॉ.केसर असे म्हणाले की, भारतातून औषधे आयात करण्याची संपूर्ण बाब योग्यप्रकारे सरकारसमोर मांडता आली नाही. त्यामुळं कच्च्या मालावरील बंदी पाकिस्तानला महागात पडू शकते. वाचा-लॉकडाऊनमध्ये कुटुंबासोबत घरात होती मेरी कोम, अचानक आले पोलीस आणि... यापूर्वी पाकिस्तानच्या मुस्लिम लीग-एन (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनीही ड्रग्ज घोटाळ्याबाबत संसदीय समितीकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते म्हणाले की, जर त्यांच्या सरकारच्या काळात असे काही घडले असते तर इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारवर देशद्रोहाचा खटला दाखल केला असता.
  Published by:Priyanka Gawde
  First published: