News18 Lokmat

पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आणखी आवळल्या जाणार; 'या' आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिला इशारा

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये घडवलेला हल्ला मोठ्या आर्थिक मदतीशिवाय घडवणं शक्य नाही, असं सांगत Financial Action Task Force (FATF) या दहशतवाद आणि जागतिक शांततेवर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. ग्रे लिस्टमध्ये असलेला पाकिस्तान काळ्या यादीत जाण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 22, 2019 08:22 PM IST

पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आणखी आवळल्या जाणार; 'या' आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिला इशारा

पॅरिस, 22 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये घडवलेला हल्ला मोठ्या आर्थिक मदतीशिवाय घडवणं शक्य नाही, असं सांगत Financial Action Task Force (FATF) या दहशतवाद आणि जागतिक शांततेवर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत कुठून मिळते याविषयी पाकिस्तानने काहीच चौकशी कशी केली नाही. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा या अतिरेकी संघटनांना कोण पोसतंय याची माहिती पुरवण्यात पाकिस्तानला यश आलेलं नाही, हा चिंतेचा विषय आहे, असं FATF या संस्थेनं म्हटलंय.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकावं यासाठी FATF वर भारताकडून दबाव आणला जात होता. या संस्थेनं पाकिस्तानला आधीच ग्रे लिस्टमध्ये टाकलं आहे. आता पुढची पायरी म्हणजे ब्लॅक लिस्ट करणं.

पुलवामा हल्ल्यात भारताच्या CRPF चे 40  जवान मृत्युमुखी पडल्याच्या घटनेनंतर FATF या पॅरिस स्थित आंतरराष्ट्रीय संघटनेनं 38 सदस्यांची बैठक घेऊन एक निवेदन जारी केलं आहे. "दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या नाड्या आवळणं आवश्यक आहे. दहशतवाद संघटनांना फंडिंग कुठून होतं याची शहानिशा पाकिस्ताननं करणं आवश्यक आहे", अशा अर्थाचं हे निवेदन आहे.

ग्रे यादीत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्थांकडून कर्ज मिळण्यात आणखी अडचणी येतील. ब्लॅक लिस्टमध्ये देश गेला की कर्जपुरवठ्याचा आंतरराष्ट्रीय ओघ पूर्ण आटतो आणि आर्थिक नाड्या आवळल्या जातात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारखी संस्था (IMF)देखील कुठला आर्थिक आधार देण्यास असमर्थता व्यक्त करते. FATF ने पाकिस्तानच्या ऑक्टोबरमध्येच करड्या यादीत टाकलं होतं. पण सौदी अरेबिया आणि चीन या पाकिस्तानच्या दोस्त राष्ट्रांनी मात्र निरीक्षकाची भूमिका घेत पाकिस्तानची बाजू घेतली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...