Home /News /videsh /

'दोन आठवड्यांच्या आत उद्ध्वस्त केलेलं मंदिर पुन्हा उभारा'; आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पुन्हा तोंडघशी

'दोन आठवड्यांच्या आत उद्ध्वस्त केलेलं मंदिर पुन्हा उभारा'; आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पुन्हा तोंडघशी

गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका हिंदू मंदिरावर (Hindu temple) काही लोकांनी हल्ला झाला होता. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं (Pakistan Sumpreme Court) या प्रकरणाची दखल घेतली असून मंदिराच्या पुनर्बांधणीचे (Temple rebuilt) आदेश दिले आहेत.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 05 जानेवारी: गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका हिंदू मंदिरावर (Hindu Mandir) काही लोकांनी हल्ला केला होता. जमावानं या मंदिराचं प्रचंड नुकसान केलं असून हे मंदिर शेकडो वर्ष जुनं आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं आता या प्रकरणाची दखल घेतली असून मंदिराच्या पुनर्बांधणीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश इव्हॅक्यु प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्डाला (EPTB) दिला आहे. या हल्ल्यामुळं देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. मौलाना आणि काही राजकीय पक्षाच्या समर्थकांनी हे मंदिर तोडून त्याला आग लावून दिली आहे. डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टानं संबंधित हल्ल्याची दखल घेण्यास सांगितलं असून स्थानिक अधिकाऱ्यांना 5 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय दोन आठवड्याच्या आत हे मंदिर पुन्हा बांधण्याची आणि तोडफोड करणार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई घ्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या करक जिल्ह्यात कट्टरपंथी जमात-उलेमा-ए-इस्लाम पक्षाच्या (फजल उर रहमान समुह) सदस्यांनी बुधवारी मंदिरावर केलेल्या हल्ल्याचा; मानवाधिकार कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक हिंदू नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. मंगळवारी सुनावणीदरम्यान, देशातील सर्व मंदिरांत झालेली अतिक्रमणं हटवून अतिक्रमणात सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने EPTB दिला आहे. न्यायमूर्ती अहमद यावेळी म्हणाले की, करक येथे घडलेल्या घटनेमुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला नाचक्की सहन करावी लागली आहे. ईपीटीबी एक स्वायत्त संस्था आहे. जी फाळणीनंतर भारतात स्थायिक झालेल्या हिंदू आणि शीखांच्या धार्मिक संपत्तीचं म्हणजेचं मंदिरांचं आणि गुरुद्वारांचं व्यवस्थापन करते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या