दहशतवादाला पोसणारा पाक कर्जानं कंगाल, महागाईमुळे भाकरीचेही वांदे! नानची दुकानं बंद

दहशतवादाला पोसणारा पाक कर्जानं कंगाल, महागाईमुळे भाकरीचेही वांदे! नानची दुकानं बंद

पेशावर शहरात तर नानची अनेक दुकानं बंद पडली आहेत. नान मिळत नसल्यानं लोकांपुढे तांदुळाचा पर्याय उरलाय. आकडेवारीचा विचार केला तर साधारणपणे प्रत्येत पाकिस्तानी नागरिकावर आज 1 लाख 53 हजार 689 रुपयांचं कर्ज आहे.

  • Share this:

कराची, 04 फेब्रुवारी: पाकिस्तानमध्ये महागाईनं कळस गाठलाय. महागाईचा दर तब्बल 14.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 12 वर्षातला महागाईचा हा उच्चांक आहे. गेल्या काही दिवसात महागाईनं सगळे रेकॉर्ड तोडलेत.  पिठाचे भाव वाढल्यानं पाकच्या जनतेला आता भाकरी खाणंही मुश्कील झालंय. पेशावर शहरात तर नानची अनेक दुकानं बंद पडली आहेत. नान मिळत नसल्यानं लोकांपुढे तांदळाचा पर्याय उरलाय. पिठाचे भाव आकाशाला भिडल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी साठेबाजांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. शिवाय किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाला कडक आदेश देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रानं दिलीय. पाकिस्तानचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स KSE 100 तीन पटीनं कोसळला असून 1225 अंकांची घसरण होऊन बंद झाला.

पाकिस्तानी नागरिकाच्या डोक्यावर 1.53 लाखांचं कर्ज

पाकिस्तानमध्ये गेल्या आर्थिक वर्षात कर्जाचा डोंगर जवळपास 28 टक्क्यांनी वाढलाय. सोप्या शब्दात सांगायचं तर प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर आज 1 लाख 53 हजार 689 रुपयांचं कर्ज आहे. कर्जबाजारीपणाचं प्रमुख कारण म्हणजे प्रशासनावरचा प्रचंड खर्च. 2018-19 या आर्थिक वर्षात खर्च सगळ्यात जास्त होता. तर सर्वसामान्य नागरिकांवर होणारा खर्च हा गेल्या 11 वर्षातला सर्वात कमी खर्च होता.

महागाईनं मोडलं पाकचं कंबरडं

पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (पीबीएस) च्या रिपोर्टनुसार महागाईचा दर वाढून 14.6 टक्क्यांवर पोहोचलाय. पीबीएसच्या आकड्यांवरून स्पष्ट दिसतंय की खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्यानं महागाईनं कळस गाठलाय. विशेष म्हणजे गव्हाचं पीठ, दाळी, साखर, गुळ आणि खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं महागाई आकाशाला भिडलीय.

पीबीएसच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात टोमॅटो 158 टक्के, कांदे 125 टक्के, ताज्या भाज्या 93 टक्के, आलू 87 टक्के, साखर 86 टक्के  महाग झालं आहे. शहरांच्या तुलनेत गावांमध्ये महागाई जास्त आहे.

First published: February 4, 2020, 4:28 PM IST

ताज्या बातम्या