पाकिस्तानात सगळ्यात मोठी पार्टी ठरली इम्रान खानची 'तेहरीक-ए-इन्साफ'

पाकिस्तानात सगळ्यात मोठी पार्टी ठरली इम्रान खानची 'तेहरीक-ए-इन्साफ'

पाकिस्तानमधल्या मतमोजणीमध्ये इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ पक्ष आघाडीवर आहे. हा पक्ष सध्या १११ जागांवर पुढे आहे.

  • Share this:

पाकिस्तान, 26 जुलै : पाकिस्तानमधल्या मतमोजणीमध्ये इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ पक्ष आघाडीवर आहे. हा पक्ष सध्या १११ जागांवर पुढे आहे. मतमोजणामध्ये अभूतपूर्व गोंधळ निर्माण झालाय. मतमोजणीची इलेक्ट्रॉनिक सिस्टम बिघडली, असं सांगण्यात येतंय. त्यामुळे जे निकाल पहाटे २ वाजता अपेक्षित होते, ते अजूनही घोषित झालेले नाहीत. पाकिस्तानमध्ये बुधवारी २७२ जागांसाठी मतदान पार पडलं. इमरान खान यांच्या कार्यकर्त्यांनी आधीच विजय साजरा करणं सुरू केलंय. रात्रभरापासून इस्लामाबादच्या रस्त्यांवर हे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत होते. फटाके फोडणं आणि नाचणं हे अनेक ठिकाणी पहायला मिळालं. इमरान पहिल्यांदाच सत्तेच्या इतक्या जवळ येऊन पोहोचलेत. पण अंतिम निकालात त्यांना बहुमत मिळतं का, ते पहावं लागेल. इमरान यांना लष्कराचा छुपा पाठिंबा आहे असं बोललं जातंय.

'त्या' पोलिसाच्या पाठीवर बुटाचा ठसा कुणाचा ?, हे आहे सत्य

पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. यासाठी मतमोजणी सुरु असून तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचे पाकिस्तानच्या स्थानिक प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंतच्या कलानुसार इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष 111 जागांवर आघाडीवर आहे. पण काल मतदानादरम्यान क्वेटा इथं झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकनियुक्त सरकारनं पाच वर्ष पूर्ण केले असून लोकशाही मार्गानं दुसरं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!

मतदानपूर्व सर्वेक्षण चाचणीत तहरीक-ए-इन्साफला निसटते बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार इम्रान यांचा पक्ष आघाडीवर आहे. शेवटपर्यंत ही आघाडी अशीच टिकून राहिली तर प्रथमच इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची संधी मिळेल.

हेही वाचा...

मराठा आंदोलनाबाबत राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं ?

दिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलन

काकासाहेबाने ज्या पुलावरुन उडी घेतली, त्याबद्दल संभाजी ब्रिगेडने घेतला 'हा' निर्णय

First published: July 26, 2018, 7:38 AM IST

ताज्या बातम्या