Home /News /videsh /

पाकिस्तानच्या नव्या सरकारसमोर 'ही' आहेत मोठी आव्हानं! कशी आहे सध्याची स्थिती

पाकिस्तानच्या नव्या सरकारसमोर 'ही' आहेत मोठी आव्हानं! कशी आहे सध्याची स्थिती

अनेक दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर पाकिस्तानात (Pakistan) इम्रान खान (imran khan) यांचे सरकार सत्तेतून बाहेर पडले. आता शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे देशाचे नवे पंतप्रधान असतील. नव्या सरकारसमोर अनेक आव्हान आहेत.

    इस्लामाबाद, 10 एप्रिल : अनेक दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर पाकिस्तानात (Pakistan) इम्रान खान (imran khan) यांचे सरकार सत्तेतून बाहेर पडले आहे. शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे देशाचे नवे पंतप्रधान असतील. अनेक पक्षांच्या युतीने स्थापन झालेल्या नव्या सरकारसमोरील आव्हाने केवळ राजकीय सुसंवाद साधण्यापुरती मर्यादित राहणार नाहीत. त्यापेक्षा शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आर्थिक आघाड्यांवर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे नव्या सरकारला हे जड जाणार आहे. राजकीय उलथापालथीची आर्थिक किंमत पाकिस्तानात काही काळ राजकीय उलथापालथ सुरू होती. गेल्या काही काळापासून देशात सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेचा परिणाम आर्थिक घडामोडींवर झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात अनिश्चिततेचे वातावरण असताना देशात राजकीय तणावाचे वातावरण दिसून आले. अशा परिस्थितीत देशात राजकीय भांडणाचा अधिक परिणाम दिसून आला. आर्थिक व्यवहार पुन्हा रुळावर आणण्याचे आव्हान शाहबाज शरीफ यांच्या सरकारसमोर असेल. परकीय चलन साठा कमी होतोय पाकिस्तानातील आघाडीच्या वृत्तपत्र 'द डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आयात बिल, रोखे उत्पन्नात वाढ आणि इतर कारणांमुळे देशाचा परकीय चलन साठा (Forex Reserve) कमी होत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) ने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, SBP च्या परकीय चलनाच्या साठ्यात साप्ताहिक आधारावर 6.04 टक्क्यांनी घट झाली आहे. 1 एप्रिल 2022 पर्यंत, SBP कडे 1,131.92 कोटी डॉलर विदेशी चलन साठा होता. अहवालानुसार, 26 जून 2020 रोजी एसबीपीचा रिझर्व्ह सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. पाकिस्तानात इम्रान खान Out..शरीफ कुटुंबाचं ComeBack, भारतावर कसा होणार परिणाम? चलनाच्या मूल्यात घट गेल्या काही सत्रांमध्ये पाकिस्तानी चलनात सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 191 रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आला. गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तानी रुपयाची घसरण होत होती. मात्र, राजकीय अस्थिरतेच्या स्थितीत त्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. दुहेरी अंकी महागाई दर शेजारील पाकिस्तानातही जनता महागाईने होरपळत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, पाकिस्तानमधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर वार्षिक आधारावर 12.2 टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी, त्यात मासिक आधारावर 1.2 टक्क्यांची वाढ दिसून आली. देशात खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईही इम्रान सरकारच्या विरोधात गेली आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. व्यापार तूट वाढली वृत्तानुसार, पाकिस्तानमधील व्यापार तूट विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. जुलै-मार्च दरम्यान देशातील व्यापार तूट 70.14 टक्क्यांनी वाढून 35.393 अब्ज झाली आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या