कंगाल पाककडून कोरोनाच्या संकटातही नागरिकांची लूट, विमानात भडकलेल्या प्रवाशांचा VIDEO VIRAL

कंगाल पाककडून कोरोनाच्या संकटातही नागरिकांची लूट, विमानात भडकलेल्या प्रवाशांचा VIDEO VIRAL

पाकिस्तानने तीनपट भाडं वसूल करूनही सुरक्षेचे नियम न पाळल्यानं फ्लाइटमध्ये नागरिक भडकल्याचं दिसतं.

  • Share this:

कराची, 09 मे : कोरोनाच्या संकटातही पाकिस्तान त्यांच्या नागरिकांची लूट करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एका फ्लाइटमधील हा व्हिडिओ आहे. यामध्ये प्रवाशांकडून तीनपट अधिक भाडं वसूल केल्यानंतरही योग्य त्या सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप केला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, प्रवाशी म्हणतात की, विमानात सोशल डिस्टन्सिंग असेल असं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात तसं काहीही नाही.

प्रवाशांकडून वाजवीपेक्षा जास्त भाडं घेतल्याची तक्रारही नागरिक करत आहेत. एकीकडे पाकिस्तानची यामुळे नाचक्की होत असताना भारताने मात्र परदेशातून नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी खास मोहिम सुरू केली आहे. यासाठी वंदे भारत आणि समुद्र सेतू अशा मोहिमा सुरु आहेत. यात नागरिकांकडून नेहमीचं भाडं घेतलं जात आहे.

आयपीएस अधिकारी असलेले छत्तीसगढमधील बिलासपूरचे आयजी दीपांशू काबरा यांनी व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्वीट केला आहे. व्हिडिओमध्ये एक नागरिक म्हणतो की, आमच्याकडून तीनपट भाडं घेतलं. 1400, 1500, 1800 डॉलरचं तिकिट 3 हजार डॉलर्सला दिलं आहे. या 3 हजार डॉलर्सची भारतीय रुपयांत सव्वा दोन लाख रुपये इतकी किंमत होते. हेच पाकिस्तानी रुपयांमध्ये जवळपास 4 लाख 75 हजार रुपये इतके होतात.

पाहा VIDEO : 'या' देशाच्या संसदेत राडा, खासदारांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी

पाकिस्तानकडून त्यांच्या नागरिकांची अशी लूट सुरू असताना भारत मात्र नेहमीच्या दरात नागरिकांना मायदेशी आणत आहे. अमेरिकेतून येणाऱ्यांकडून 1 लाख रुपये, ब्रिटनच्या नागरिकांना 50 हजार तर आखाती देशांमधून परतणाऱ्याकडून 15 हजार रुपये भाडं आकारलं जात आहे.

हे वाचा : कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट? ज्यांचे कोरोनामुळे बुडाले 2.28 लाख कोटी

First published: May 9, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या