पंतप्रधान मोदींना पाकिस्तानने धाडलं 2.86 लाखांचं नेव्हिगेशन बिल!

पंतप्रधान मोदींना पाकिस्तानने धाडलं 2.86 लाखांचं नेव्हिगेशन बिल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायूदलाच्या ज्या विमानातून लाहोरला गेले होते, पाकिस्तानने त्या विमानाचं 'रूट नेव्हिगेशन' शुक्ल म्हणून मोदींना 2.86 लाखांचं बिल पाठवलं आहे.

  • Share this:

19 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायूदलाच्या ज्या विमानातून लाहोरला गेले होते, पाकिस्तानने त्या विमानाचं 'रूट नेव्हिगेशन' शुक्ल म्हणून मोदींना 2.86 लाखांचं बिल पाठवलं आहे. अशी माहिती आरटीआयकडून सांगण्यात आली आहे.

लाहोरमध्ये पंतप्रधान मोदींचं हे विमान थांबले होतं. आणि रशिया, अफगाणिस्तान, इराण, कतारमधील मोदींच्या यात्रेसंदर्भात हे बिल पाठवण्यात आलं आहे. सेवानिवृत्त कमोडोर लोकेश बत्रा यांनी यासंदर्भात माहिती मागवली असता त्यात असे म्हटले आहे की,

'जून 2016पर्यंत पंतप्रधान मोदींनी नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूर या 11 देशांमध्ये प्रवास करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानाचा वापर केला होता. या दरम्यान 25 डिसेंबर 2015ला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निमंत्रणावरून मोदी काही काळ लाहोरमध्ये राहिले होते.' याचे नेव्हिगेशन चार्ज पाककडून लावण्यात आले आहे.

आरटीआयकडून प्राप्त झालेली माहिती

मोदी जेव्हा रशिया आणि अफगाणिस्तानातून परतत होते तेव्हा ते काही काळ पाकिस्तानात उतरले. या दरम्यानचा 1.49 लाख रुपयांचा नेव्हिगेशन चार्ज पाकिस्तानकडून लावण्यात आला आहे.

तसंच मार्च 2016मध्ये ईरान दौऱ्यासाठी 77 हजार 215 रुपये आणि क्यूई दौऱ्यासाठी 59,171 रुपये इतका नेव्हिगेशन चार्ज आकारण्यात आला आहे.

First published: February 19, 2018, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading