मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

गाईच्या शेणापासून धावणार बसेस, पाहा पाकिस्ताननं कशी केली कमाल?

गाईच्या शेणापासून धावणार बसेस, पाहा पाकिस्ताननं कशी केली कमाल?

पाकिस्तानात गायीच्या शेणावर चालणाऱ्या बसेस ग्रीन बस रॅपिड ट्रांझिट नेटवर्क नावानं ओळखल्या जातात. शेणापासून बायो मिथेन गॅस बनवला जातो आणि त्यावर या बसेस चालतात.

पाकिस्तानात गायीच्या शेणावर चालणाऱ्या बसेस ग्रीन बस रॅपिड ट्रांझिट नेटवर्क नावानं ओळखल्या जातात. शेणापासून बायो मिथेन गॅस बनवला जातो आणि त्यावर या बसेस चालतात.

गाईच्या शेणापासून कराचीमध्ये बसेस धावणार आहेत. ग्रीन गॅसच्या माध्यमातून पाकिस्तान कार्बन डाय ऑक्साईडचं उत्सर्जन थांबवत आहे आणि त्यासाठीचाच हा प्रयोग आहे.

  पाकिस्तान, 10 जानेवारी : पाकिस्तान मागील वर्षांपासून गाईच्या शेणापासून चक्क गाड्या चालवण्याचा प्रयोग करत आहे. गाईच्या शेणापासून कराचीमध्ये लवकरच बसेस धावणार आहेत. ग्रीन गॅसच्या माध्यमातून पाकिस्तान कार्बन डाय ऑक्साईडचं उत्सर्जन थांबवत आहे आणि त्यासाठीचाच हा प्रयोग आहे. कशी आहे पाकिस्तानची ग्रीन गॅस योजना ? मागील वर्षी पाकिस्ताननं गाईच्या शेणापासून हायब्रीड बसेस चालवण्याची घोषणा केली होती. त्या दृष्टीनं पाकिस्ताननं प्रयत्न सुरू केले होते. आता पाकिस्तानची ही योजना पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे लवकरच पाकिस्तानच्या कराचीमध्ये 200 बसेस गाईच्या शेणापासून धावणार आहे. तशी माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. जगातील सर्वात वेगळा प्रयोग जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) ताज्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी 40 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळं मृत्यू होतो. वायू प्रदूषणामुळं विविध रोगांना नागरिकांना बळी पडावं लागतं. वायू प्रदूषणात मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये सर्वात वरच्या स्थानी पाकिस्तान आहे. हिवाळ्यात धूर आणि धुक्यामुळे वायूप्रदूषण भयंकर असल्यानं दरवर्षी पाकिस्तानात 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत स्मॉग सीझन घोषित केला जातो.  वाढतं प्रदूषण लक्षात घेता पाकिस्तानमध्ये गाईच्या शेणापासून बस चालवण्याचा ग्रीन प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. यातून वातावरणात ग्रीन गॅस जाऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. ग्रीन बस कशा धावणार? प्रदूषण कमी करण्यासाठी पाकिस्ताननं हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. यातून नक्कीच पाकिस्तानला फायदा होणार आहे.  ग्रीन बस रॅपिड ट्रान्झीट नेटवर्क असं नाव या प्रकल्पाला देण्यात आलं आहे. या बसेससाठी खास कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. 30 किलोमीटरचा हा कॉरिडॉर असणार आहे.  शेणापासून मिथेन गॅस तयार करून त्यापासून इंधन तयार केलं जाणार आहे आणि त्यामाध्यमातून बसेस धावणार आहे. वाचा - ‘मॅच जिंकला नाही तर...’, दिग्गज क्रिकेटपटूला पत्नीनं दिली धमकी; VIDEO VIRAL पाकिस्तानमध्ये चार लाखांहून अधिक गाई आणि म्हशी आहेत. एक संस्था गाई म्हशीचं शेण गोळा करणार आहे. त्यानंतर ते शेण कराचीतील बायोगॅस प्रकल्पाला देण्यात येणार आहे. या प्रकल्पात शेणापासून मिथेन गॅस तयार केलं जाणार आहे. तयार झालेलं मिथेन गॅस बसेस पर्यंत पोहचवला जाणार आहे. वायू आणि जल प्रदूषण रोखणार गेल्या वर्षी या प्रयोगाची घोषणा करण्यात आली होती. 2020मध्ये पाकिस्तानचा ग्रीन प्रोजेक्ट जवळपास तयार असल्याची माहिती आहे.  या ग्रीन प्रोजेक्टमुळे पाकिस्तानची हवा तस शुद्ध होणारच आहे. वाचा - पाकिस्तान रचतोय हल्ल्याचा नवा डाव, दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ल्याची शक्यता शिवाय जलप्रदूषण कमी होणार आहे. त्यामुळे या ग्रीन प्रकल्पाचा दुहेरी फायदा पाकिस्तानला होणार आहे. 200 बसेस धावणार रस्त्यावर गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या मिथेन गॅसपासून 200 हायब्रीड बसेस रस्त्यावर धावणार आहे. त्यासाठी 25 नवं बस स्टेशन तयार करण्यात आले आहे. यासाठी पाकिस्तान सरकार इंटरनॅशनल ग्रीन क्लायमेट फंडची मदत घेणार आहे. कराचीत पाकिस्तानचा ग्रीन गॅसचा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील काळात  लाहोर, मुलतान, पेशावर आणि फैसलाबाद शहरांच्या रस्त्यांवरही ग्रीन बसेस धावणार आहेत. हायब्रीड बसमधून शून्य टक्के प्रदूषण होणार ग्रीन बसेसमुळं पाकिस्तानमधील कराचीतील प्रदूषण कमी होणार आहे. ज्या भागातून ह्या बसेस धावणार त्या भागातील प्रदूषण शून्य टक्के होणार आहे. त्यामुळं पुढील काळात पाकिस्तानमधील प्रदूषण कमी होणार यात शंका नाही. 583 मिलियन डॉलर खर्चून पाकिस्तान ग्रीन बसेसचा प्रयोग राबवतोय.  यातील 49 मिलियन डॉलर द ग्रीन क्लायमेट फंड देणार आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीतून पाकिस्तान देशातील प्रदूषण कमी करतंय. हे संगठण जगातील कोणत्याही देशाला  प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक मदत देते. अन्य बातम्या कमालच म्हणायची! चुरा करून खाल्ला 64 लाखांचा हिरा, X-Rayनं शोधला चोर आता 5 दिवसांत सुरू करू शकता कोणताही बिझनेस, मोदी सरकार करणार हे बदल तानाजी रीलिज होताच JNU बद्दल बोलला अजय देवगण; नाव न घेता दीपिकाला दिला सल्ला?
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Pakistan

  पुढील बातम्या