मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काबुल एअरपोर्ट नव्हे सीमेवरून पाकिस्तानात जाण्यासाठी आहे ही गर्दी; VIRAL VIDEO मागचं सत्य

काबुल एअरपोर्ट नव्हे सीमेवरून पाकिस्तानात जाण्यासाठी आहे ही गर्दी; VIRAL VIDEO मागचं सत्य

ही गर्दी काबुल एअरपोर्टवरची नाही. सीमेवरच्या विमानतळावरची आहे. या सगळ्यांना पाकिस्तानात जायचंय.

ही गर्दी काबुल एअरपोर्टवरची नाही. सीमेवरच्या विमानतळावरची आहे. या सगळ्यांना पाकिस्तानात जायचंय.

काबुल एअरपोर्टपेक्षाही खचाखच गर्दी आहे अफगाण सीमेजवळ. पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी सीमेवर हजारो अफगाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पाहा VIDEO

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: अफगाणिस्तानवर (Afghanistan crisis latest news) तालिबाननं (Taliban) ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांच्या क्रूर शासनामुळे धास्तावलेले हजारो नागरिक इथून सुटका करून घेण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपडत आहेत. 15 ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास 80 हजारांहून अधिक नागरिक विमानाने देशाबाहेर गेल्याचे अमेरिकेनं (USA in Afghanistan)  म्हटलं आहे. काबूल विमानतळावर (Kabul Airport) अफगाणी नागरिकांनी केलेली प्रचंड गर्दी, विमानाला लटकून जाण्याचा प्रयत्न करणारे नागरिक यांचे असंख्य फोटो जगभरात पसरले आहेत. पण या काबुल विमानतळापेक्षाही जास्त गर्दी झाली होती अफगाणिस्तानच्या सीमेजवळ (Spin Boldak Border). पाकिस्तानात जाऊ इच्छिणाऱ्या अफगाणी नागरिकांच्या गर्दीचा एक VIDEO सोशल मीडियावर VIRAL झाला आहे.

काबुल एअरपोर्टजवळचे अनेक VIDEO माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. आपल्या लहानग्या बाळांची तरी सुटका व्हावी म्हणून हृदयावर दगड ठेवून तारेच्या कुंपणावरून त्यांना सैनिकांकडे फेकणाऱ्या माता यांचे फोटो, व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते बघून सगळ्या जगाचे डोळे पाणावले. अनेक देशांनी इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी आपले प्रवेशद्वार खुले केले आहे. भारतानही आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) सुरू केलं आहे. भारतीय हवाई दलाची विमाने काबूल विमानतळावरून भारतीय नागरिक आणि अन्य नागरिकाना मायदेशी घेऊन येत आहेत. नाटो देशही (NATO countries) आपल्या नागरिकांना आणि अफगाणी  नागरिकांना बाहेर काढत आहेत.

Kabul Airport Blast: 'मानवी अवयव हवेत उडत होते..', अंगावर काटा आणणारा अनुभव

आताही हजारो नागरिक आपल्या सुटकेच्या प्रतीक्षेत मिळेल त्या दिशेला धावत आहेत. सगळ्या जगाचे लक्ष काबूल विमानतळावर आहे मात्र आणखी एका ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी झाली आहे.  हे ठिकाण आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील  स्पिन बोल्दाक सीमारेषा (Spin Boldak Border). पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची सीमा खेटून असल्यानं हजारो नागरिक पाकिस्तानमध्ये प्रवेश करण्यासाठी इथं जमले असून, इथले  दरवाजे उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत.

Explainer: अफगाणिस्तानातून सुटकेच्या भारतीय मोहिमेचा दुर्गा मातेशी असा आहे संबंध

या ठिकाणी कोणतंही परदेशी सैन्य नाही की कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे मीडियानंही इकडे लक्ष दिलेलं नाही असं सांगत पत्रकार नातिक मलिकजादा,(Natiq Malijada) यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून इथल्या परिस्थितीकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. काबूल विमानतळापेक्षा इथली स्थिती भीषण आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

एका अहवालानुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 14 ख अफगाण नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

अमेरिकेनं अफगाणिस्तानातील आपलं सैन्य 20 वर्षांनतर काढून घेतलं आणि अफगाणी नागरिकांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. सुरुवातीला अफगाणिस्तानच्या लष्करानं तालिबानला प्रत्युत्तर दिलं, मात्र अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी देश सोडून पळून गेले. त्यामुळं तालिबाननं थेट राजधानी काबूलमध्ये धडक देत सत्ता हस्तगत केली. अफगाणिस्तानातील पंजशीर प्रांत वगळता सर्वत्र तालिबानचे राज्य स्थापन झाले आहे. त्यामुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये आश्रयाला जात आहेत.

First published:

Tags: Afghanistan, Kabul, Pakistan, Taliban