'आम्ही श्रीनगर घेण्याच्या गप्पा करायचो आता POK वाचवण्याचा प्रयत्न करतोय'; पाकला घरचा आहेर!

काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका मिळाल्यानंतर आता पाक POK वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 07:57 PM IST

'आम्ही श्रीनगर घेण्याच्या गप्पा करायचो आता POK वाचवण्याचा प्रयत्न करतोय'; पाकला घरचा आहेर!

इस्लामाबाद, 27 ऑगस्ट: मोदी सरकारने जम्मू-काश्मीर(Kashmir)ला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान(Pakistan)ने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना कोणीच साथ दिली नाही. आता पाकिस्तानला चिंता लागली आहे ती पाक व्याप्त काश्मीर हातातून जाण्याची. विशेष म्हणजे ही भिती अन्य कोणी नाही तर खुद्द पाकिस्तानी नेत्याने बोलून दाखवली आहे आणि हा नेता कोणी किरकोळ नसून पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा मुलगा, पाकिस्तान पिपल्स पार्टी(Pakistan Peoples Party)चे चेअरमन बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto)हे आहेत.

काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका मिळाल्यानंतर आता पाक POK वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना PPPचे चेअरमन बिलावल म्हणाले एके काळी आम्ही काश्मीर हातात घेण्याच्या गोष्टी करत होतो. आता आम्ही मुझफ्फराबाद वाचवण्याची योजना करत आहोत. जो पाकिस्तान एके काळी काश्मीरची चर्चा करत होतो, तो आज POK कसे वाचवायचे याचा विचार करत आहे. आज तक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल म्हणाले, पाकिस्तान आणि भारत यांचा इतिहास पाहिल्यास या दोन्ही देशांचे संबंध कधीच चांगले नव्हते. पण या दोन्ही देशातील युवकांना माहित आहे की संबंध सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांततेचा आहे. आम्हाला याच मार्गाने उपाय शोधायचा आहे.

दहशतवादी पाकिस्तानातूनच येतात...

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावलने हे देखील मान्य केले की पाकिस्तानमधील नॉन स्टेट अॅक्टर्स म्हणजेच दहशतवादी भारतात हल्ले करतात. पण या दहशतवाद्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही. बिलावल यांनी हे देखील सांगिले की, भारताच्या मदतीने दहशतवाद्यांना धडा शिकवता येऊ शकतो. पाकिस्तानला एकट्याला दहशतवाद्यांना रोखता येणार नाही.

इमरान खान यांच्यावर काश्मीर विकण्याचा आरोप...

Loading...

पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी याआधीच इमरान खान सरकारवर काश्मीर विकल्याचा आरोप केला होता. आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणून इमरान खान यांनी काश्मीर विकल्याचा आरोप विरोध पक्षांनी केला आहे. या सरकारला पाडण्यासाठी इस्लामाबादला घेराव घालण्याची धमकी देखील विरोधकांनी दिली आहे.

SPECIAL REPORT : सुप्रिया सुळेंच्या 'शुभेच्छा' अन् भुजबळांना पोहोचला 'निरोप'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 07:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...